फेरबदलाचा फटका कुणाला? नाराजांना दणका देताना शिवसेनेची १५ खाती काँग्रेस, राष्ट्रवादीच्या पारड्यात!

187

शिवसेनेतील ३९ आमदारांना घेऊन शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राच्या बाहेर पडले आहेत. त्यामध्ये ४ कॅबिनेट मंत्री आणि ६ राज्यमंत्री आहेत, त्यातील एक बच्चू कडू हे प्रहार जनशक्ती खात्याचे आहेत. या मंत्र्यांची खाती दुसऱ्या मंत्र्यांना देण्यात आली आहेत. त्यामध्ये शिवसेनेच्या वाट्यातील मंत्रिमंडळातील ४ खाती शिवसेनेच्याच कॅबिनेट मंत्र्यांकडे सोपवण्यात आली आहेत. मात्र शिवसेनेकडील राज्यमंत्र्यांच्या खात्यांतील ९ खाती राष्ट्रवादीकडे आणि ६ खाती काँग्रेसकडे देण्यात आली आहेत. अशा प्रकारे मंत्रिपदाचा फेरबदल काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पथ्यावर पडला आहे.

कोणाकडे कोणतं खातं?

४ कॅबिनेट मंत्री 

  • १. गुलाबराव पाटील (पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री) – अनिल परब (शिवसेना)
  • २. एकनाथ शिंदे (नगरविकास मंत्री) – सुभाष देसाई (शिवसेना)
  • ३. दादा भुसे (कृषी मंत्री) – शंकरराव गडाख (शिवसेना)
  • ४. उदय सामंत (उच्च तंत्र शिक्षण मंत्री) – आदित्य ठाकरे (शिवसेना)
  • संदिपान आसाराम भुमरे (रोजगार हमी, फलोत्पादन खाते) – शंकर यशवंतराव गडाख (क्रांतिकारी शेतकरी पक्ष)

(हेही वाचा बंडखोर आमदारांनी महाराष्ट्रात परतावे! उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल)

५ राज्यमंत्री  

१. अब्दुल सत्तार 

  • प्राजक्त तनपुरे (राज्यमंत्री, महसूल, ग्राविकास, बंदरे, खार जमिनी विकास) (राष्ट्रवादी)

२. शंभूराज शिवाजीराव देसाई  

  • संजय बाबुराव बनसोडे, राज्यमंत्री (गृह ग्रामीण) (राष्ट्रवादी)
  • विश्वजित पतंगराव कदम, राज्यमंत्री (वित्त) (काँग्रेस)
  • सतेज उर्फ बंटी डी. पाटील (नियोजन, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन) (काँग्रेस)

३. राजेंद्र शामगोंडा पाटील यड्रावकर  

  • विश्वजित पतंगराव कदम, राज्यमंत्री (सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण) (काँग्रेस)
  • प्राजक्त प्रसाद तनपुरे, राज्यमंत्री (वैद्यकीय शिक्षण, वस्त्रोद्योग),  (राष्ट्रवादी)
  • सतेज उर्फ बंटी डी. पाटील, राज्यमंत्री (अन्न व औषध प्रशासन), (काँग्रेस)
  • आदिती सुनिल तटकरे, राज्यमंत्री (सांस्कृतिक कार्य) (राष्ट्रवादी)

(हेही वाचा राज्यातील सत्तासंघर्षात न्यायालयाच्या निर्णयाने नवा ट्विस्ट, झिरवळ,प्रभु,केंद्राला नोटीस )

४. अब्दुल नबी सत्तार, राज्यमंत्री 

  • प्राजक्त प्रसाद तनपुरे, राज्यमंत्री (महसूल), (राष्ट्रवादी)
  • सतेज उर्फ बंटी डी. पाटील, राज्यमंत्री (ग्राम विकास), (काँग्रेस)
  • आदिती सुनिल तटकरे, राज्यमंत्री (बंदरे, खार जमिनी विकास, विशेष सहाय्य) (राष्ट्रवादी)

प्रहार जनशक्ती

५. ओमप्रकाश उर्फ बच्चू बाबाराव कडू, राज्यमंत्री यांच्याकडील खाती 

  • आदिती सुनिल तटकरे, राज्यमंत्री (शालेय शिक्षण), (राष्ट्रवादी)
  • सतेज उर्फ बंटी डी. पाटील, राज्यमंत्री (जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, कामगार), (काँग्रेस)
  • संजय बाबुराव बनसोडे, राज्यमंत्री (महिला व बाल विकास), (राष्ट्रवादी)
  • दत्तात्रय विठोबा भरणे, राज्यमंत्री (इतर मागास बहुजन कल्याण)  (राष्ट्रवादी)

(हेही वाचा ‘मविआ’ सरकारची आणखी एक खेळी, ‘शिंदे गटा’तील मंत्र्यांच्या खात्यांचं फेरवाटप)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.