“स्थानिक स्वराज्य संस्था जिंका, शिल्लक सेना संपवून टाका” , Eknath Shinde यांचा कार्यकर्त्यांना कानमंत्र

62
"स्थानिक स्वराज्य संस्था जिंका, शिल्लक सेना संपवून टाका" , Eknath Shinde यांचा कार्यकर्त्यांना कानमंत्र

विधानसभा निवडणुकीत महायुतीला अभूतपूर्व यश मिळाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडून राज्यात आभार यात्रा काढण्यात आली. नाशिकमध्ये (nashik) या यात्रेच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत शिंदे बोलत होते. या वेळी शिंदेंनी (Eknath Shinde) उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) निशाणा साधला. तर, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या (BMC Election) पार्श्वभुमीवर कार्यकर्त्यांना कानमंत्रही दिला.

“शिवसेनेतील बंडानंतर मुख्यमंत्री (Eknath Shinde) झाल्यावर पहिल्या भाषणात दोनशेपेक्षा आमदार निवडून आणण्याचे दिलेले आव्हान मी पूर्ण केले आहे. त्यामुळे मी एकदा जो शब्द दिला तर तो मी पाळतोच. मी साधा माणूस आहे. पण मला हलक्यात कोणी घेऊ नका. ज्यांनी हलक्यात घेतले त्यांचे काय झाले? त्यामुळे मी अधिक खोलात जाणार नाही.” असं शिंदे (Eknath Shinde) म्हणाले आहेत.

बंद पडलेले सर्व प्रकल्प सुरू केले
पुढे बोलताना ते म्हणाले, अडीच वर्षापूर्वी उठाव केला तेव्हा हा शिंदे (Eknath Shinde) जिंकणार की शहीद होणार, याकडे लोकांचे लक्ष होते. हा एकनाथ शिंदे कोणालाही घाबरत नाही. आम्ही सत्तेच्या विरोधात लढलो आणि जिंकलोही, असे सांगत मुख्यमंत्री झाल्यानंतर पायाला भिंगरी लावून राज्यभर फिरलो, असे शिंदेंनी (Eknath Shinde) या वेळी सांगितले. मी फेसबुक लाइव्ह न करता लोकांशी फेस टू फेस राहिलो. बंद पडलेले सर्व प्रकल्प सुरू केले. लाडकी बहीणसारखी योजना आणली. मात्र, यात काहींनी खोडा घालण्याचा प्रयत्न केला. तुम्ही खोडा घालणाऱ्यांना जोडा लगावला. असा टोला शिंदे यांनी विरोधकांना लगावला. आम्हाला गद्दार, खोके किती दिवस बोलणार, आम्ही तुम्हाला खोक्यात बंद केले. (Eknath Shinde)

टॅक्सचा बोजा उतरवणार
नाशिककरांवरील वाढीव घरपट्टीचा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे नाशिककरांवरील टॅक्सचा बोजा येत्या काही दिवसांत उतरवणार असल्याचे आश्वासन शिंदे (Eknath Shinde) यांनी दिले. त्याचबरोबर सिडकोतील घरे फ्री होल्ड करण्यात आली असून, त्याचीदेखील अंमलबजावणी लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले. (Eknath Shinde)

स्थानिक स्वराज्य संस्था जिंका
लाडक्या बहिणी व शिवसेनेच्या खंद्या कार्यकत्यांनी आमदार निवडून दिले आहेत. आता महापालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी नेत्यांची आहे. ही जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडून शिल्लक राहिलेली सेना (उबाठा) संपवून टाका. या निवडणुकांसाठी शिवसेना गावागावांत, तसेच लोकांच्या मनात पोहोचवा. असे आवाहन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केले. (Eknath Shinde)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.