विधानसभा निवडणुकीत महायुतीचे अक्षरशः विरोधकांचा सुपडा साफ केल्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होतील, अशी चर्चा सुरु असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे महत्वाचे विधान समोर आले आहे. मुख्यमंत्रिपदाबाबत आमचे काहीच ठरले नव्हते, असे वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केले.
(हेही वाचा Maharashtra Assembly Election Result 2024: मविआला मोठा धक्का! महाराष्ट्रात विरोधी पक्षनेता नसणार?)
महायुतीत ज्या पक्षाला जास्त जागा मिळतील, त्याचा मुख्यमंत्री, असे आमचे काही ठरले नव्हते. प्रथम निवडणुकीच्या निकालाचे अंतिम आकडे येऊ दे. मग आम्ही तिन्ही पक्ष ज्याप्रमाणे जागावाटपाच्या चर्चेसाठी बसलो होतो, त्याप्रमाणे एकत्र बसू. पंतप्रधान मोदी, अमित शाह आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष जे.पी.नड्डा आणि तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते एकत्र बसून चर्चा करतील. आम्ही जशी निवडणूक लढलो तसा मुख्यमंत्रीपदाबाबतही एकत्र चर्चा करुन निर्णय घेऊ, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या वक्तव्यामुळे ते मुख्यमंत्रिपदावरील दावा सहजासहजी सोडणार नाहीत, असे संकेत मिळत आहेत.
Join Our WhatsApp Community