शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांना मुख्यमंत्री असताना व्यासपीठावरून खाली उतरवले. त्यांचे घर जाळण्यासाठी माणसे पाठवली, तर रामदास कदम यांचादेखील कार्यक्रम करण्यासाठी ज्यांनी कारस्थान रचले, असा व्यक्ती नेता कसा असू शकतो, असा हल्लाबोल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी यांच्यावर केला.
कोल्हापुरात शिवसेनेचे राज्यव्यापी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात शनिवारी शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर आरोपांच्या फैरी झाडल्या. यावेळी त्यांनी पक्षातल्या कुरघोड्या चव्हाट्यावर आणल्या. आता याला उद्धव ठाकरे काय उत्तर देणार, हे पाहावे लागेल.
(हेही वाचा – Eknath Shinde : सुडाचे राजकारण करणारा नेता असतो का? असा सवाल करत शिंदेंनी ठाकरेंवर साधला निशाणा)
असे सांगून शिंदे पुढे म्हणाले की, काही लोकांना आयत्या पीठावरदेखील नीट रेघोट्या मारता आल्या नाहीत. मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना त्यांना भर व्यासपीठावरून खाली उतरवण्यात कोणाचे कारस्थान आहे. मनोहर जोशी यांचे घर जाळण्यासाठी माणसे पाठवण्यामागे कोणी कट रचला होता, असे म्हणत उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला.
तेव्हाच पक्ष मोठा होईल…
एखादा कार्यकर्ता बोलायला लागला, चांगले भाषण करायला लागला तर त्याचे भाषण कट केले जात होते. गुलाबराव पाटील, रामदास कदम अशी अनेक नावे आहेत. चांगले नेतृत्त्व आणि वक्तृत्व करत होते, पण त्यांना समजवण्याचे काम झाले होते. दोन-चार टकल्यांना सोबत घेऊन पक्ष मोठा होत नाही. कुठली निवडणूक जिंकलो तर मला ठाकरे म्हणाले की, तुमच्यासारखे तीन-चार एकनाथ शिंदे पाहिजे, पण त्यांना प्रामाणिकपणे सांगितले, एकनाथ शिंदे नको तर त्या ताकदीचे कार्यकर्ते महाराष्ट्रात तयार केले पाहिजेत तेव्हाच पक्ष मोठा होईल.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community