विधानसभा निवडणुकीत महायुतीचे जागा वाटप जवळ जवळ पूर्ण झाले आहे. आता पुन्हा सरकार बसवण्याच्या दृष्टीने एक एक आमदार निवडणूक आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु झाले आहेत. सरकारच्या विरोधात ज्या ज्या गोष्टी असतील त्या मिटवण्यावर महायुतीतील घटक पक्षांची धावपळ सुरु झाली आहे. त्यामध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्यावर जी नाराजी आहे, ती संपवण्याची धडपड सुरु झाली आहे. त्यासाठी आता शिंदेंच्या शिवसेनेचे आंतरवाली सराटी येथे भेटीगाठी वाढल्या आहेत.
शिंदेंच्या शिवसेनेकडून मनोज जरांगे पाटील (Jarange Patil) यांच्याशी बोलण्यासाठी मंत्री उदय सामंत यांची निवड करण्यात आली आहे. मागील तीन-चार महिन्यांपासून उदय सामंत जरांगे पाटलांच्या (Jarange Patil) वारंवार भेटी घेत आहेत. शनिवार, २६ ऑक्टोबर रोजीही सामंत हे जरांगे पाटलांना भेटले. छत्रपती संभाजीनगरमधील संदीपान भुमरे हेही जरांगे पाटलांना भेटले. त्यानंतर सामंत भेटले. सहकाऱ्यांचे एबी फॉर्म घेऊन मी संभाजीनगरमध्ये आलो होतो. मात्र जरांगे यांच्या भेटीमध्ये राजकीय चर्चा झाली नाही. कोणत्या मागण्या पूर्ण होऊ शकतात, यावर चर्चा झाल्याचा दावा सामंत यांनी केला.
जरांगे पाटील (Jarange Patil) हे विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करण्याविषयी भूमिका मांडणार आहेत. ते उमेदवार पाडण्यासाठी उभे करायचे की जिंकण्यासाठी यावरही ते निर्णय घेणार आहेत. लोकसभा निवडणुकीत जरांगे पाटलांचा महायुतीला फटका बसला होता, आता विधानसभा निवडणुकीतही पुनरावृत्ती होऊ नये यासाठी महायुतीची धडपड सुरू झाली आहे.
Join Our WhatsApp Community