मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ९ एप्रिल रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार असून तिथे ते रामलल्लांचे दर्शन घेणार आहेत. तसेच तिथे ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची देखील भेट घेणार आहेत. त्याआधी शिवसैनिक ७ एप्रिल रोजी ठाण्यावरून विशेष रेल्वेने अयोध्येला रवाना झाले. या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः ठाणे रेल्वेस्थानकात आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले होते की, ‘राम हे दैवत असून मी सुद्धा अयोध्येला जाणार आहे. पटोले यांच्या वक्तव्यावर माध्यमांच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांना प्रतिक्रिया विचारली असता, शिंदे म्हणाले की, आमच्यामुळे का होईना अनेक लोक रामलल्लांचे दर्शन घेत आहेत हे चांगले आहे. यावर माध्यमांच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांना विचारले की, तुमच्या अयोध्या दौऱ्याची विरोधकांनी धास्ती घेतली आहे, असे तुम्हाला वाटते का? या प्रश्नावर उत्तर देताना शिंदे यांनी विरोधकांना आणि प्रामुख्याने उद्धव ठाकरे यांना त्यांच्या नावाचा उल्लेख टाळत टोला लगावला. माझ्या दौऱ्याची त्यांनी धास्ती घेतली आहे की नाही हे मी म्हणणार नाही. पण मी सर्वांना कामाला लावले आहे. ही वस्तुस्थिती आहे. जे लोक घरात बसायचे ते आता रस्त्यावर येऊ लागले आहेत, फिरू लागले आहेत ही चांगली बाब आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी अनेकदा उद्धव ठाकरे वेळ देत नाहीत, मातोश्रीबाहेर पडत नाही, अशी टीका मुख्यमंत्री शिंदे यांनी केली.
(हेही वाचा सावरकरांच्या हिंदुत्वाची धार : संघ, भाजप, शिंदेंवर हल्ला चढवायला ठाकरे, पवार, राऊतांना सापडले हत्यार!)
Join Our WhatsApp Community