राज्यातील राजकीय सत्तासंघर्ष सुरूच आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर, राज्यात बंडखोर आमदारांच्या ऑफिसवर शिवसैनिक हल्ला करत आहेत. काही बंडखोर आमदारांचे पोस्टर फाडले तर शनिवारी बंडखोर आमदार तानाजी सावंत यांच्या ऑफीसची तोडफोड करण्यात आली. त्यानंतर आता एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उल्हासनगरच्या ऑफीसवर शिवसैनिकांनी दगडफेक केली आहे.
( हेही वाचा शिंदे गटाचे नवे नाव ‘शिवसेना बाळासाहेब गट’ )
10 जुलैपर्यंत जमावबंदी
एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंंतर, त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांच्या ऑफिसवर हल्ले होत आहेत. शिवसैनिक आक्रमक होऊन, रस्त्यावर उतरत आहेत. शुक्रवारी बंडखोर आमदार संदीपान भुमरे, दिलीप लांडे, मंगेश कुडाळकर यांच्या कार्यालयावर हल्ले झाले. बंडखोर आमदार तानाजी सावंत यांच्याही कार्यालयावर शनिवारी हल्ला करण्यात आला. बंडखोरी करणा-यांविरोधात शिवसैनिक आक्रमक झाल्याने, आता 10 जुलैपर्यंत राज्यात जमावबंदी लावण्यात आली आहे.
Join Our WhatsApp Community