शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि नाराज आमदार एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्यतील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. ३९ आमदार तसेच ८ मंत्रीही शिंदे गटात सहभागी झाले आहेत. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले आहे. शिवसैनिक आणि शिंदे समर्थक रस्त्यावर उतरले आहेत. सोमवारी आनंद आश्रम येथे शिंदे समर्थकांनी गर्दी करत, संजय राऊतांविरोधात घोषणाबाजी केली.
त्यांना उत्तरं देण्यात मला रस नाही
यावेळी श्रीकांत शिंदे म्हणाले की, शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणारी आहे. जे आमदार शिंदे गटात सहभागी झाले आहेत. त्यापैकी कुणीही शिवसेना सोडली नाही, असे म्हटले आहे. महाराष्ट्रातील जनता सर्वकाही बघत आहे. माणसाच्या पायाखालची जमीन सरकायला लागल्यावर, अशा प्रकारची विधाने केली जातात. भविष्यात त्यांना उत्तरे दिली जातील. राऊतांच्या तोंडातून जे काही बाहेर पडते त्यावर उत्तर देण्यात मला रस नाही. त्यांनी या पोकळ धमक्या दुस-यांना द्याव्यात, असे श्रीकांत शिंदे यावेळी म्हणाले.
( हेही वाचा आमदारांचे फुटणे, शिवसेनेच्या पथ्यावर )
दिघे साहेबांचा आशिर्वाद आमच्यासोबत
न्यायालयातील लढाई आम्ही चांगल्याप्रकारे जिंकू, सगळे आमदार एकत्र बसून पुढचे निर्णय घेतील. तसेच, संजय राऊतांना ईडीचे समन्स आले असेल, तर त्यांना शुभेच्छा असे म्हणत श्रीकांत शिंदे यांनी राऊतांना टोला लगावला आहे. दिघे साहेबांचा आशिर्वाद आमच्यासोबत आहे, असेही श्रीकांत शिंदे म्हणाले.
Join Our WhatsApp Community