शिवसेना सोडणार? एकनाथ शिंदेंनी स्पष्ट सांगितले

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत 46 आमदार असल्याची माहिती असल्यामुळे राज्यातील सरकार कोसळणार अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे आता शिवसेनेतून बाहेर पडणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले असताना आता एकनाथ शिंदे यांनी याबाबत भाष्य केले आहे.

आपल्यासोबत असलेल्या आमदारांची संध्याकाळी आम्ही बैठक घेणार आहोत आणि त्यात आपण आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

(हेही वाचाः महाविकास आघाडी सरकार कोसळणार? पवारांचे दोन शब्दांत उत्तर)

काय म्हणाले शिंदे?

मंगळवारी एकनाथ शिंदेंसह बंडखोर आमदारांचा गट सूरत येथे रवाना झाला होता. त्यानंतर आता बुधवारी हे सर्व आमदार गुवाहटी येथे रवाना झाले आहेत. यावेळी थेट गुवाहटीतून एकनाथ शिंदे यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला. यावेळी पक्षाला सोडचिठ्ठी केव्हा देणार, याबाबत विचारले असता एकनाथ शिंदे यांनी सोबत असलेल्या आमदारांची बैठक घेऊन निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले. आम्ही एकत्र आहोत. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत, त्यांच्याशी एकनिष्ठ आहोत, असेही शिंदे यांनी म्हटले आहे.

उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यावा का?

एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर आता नैतिक जबाबदारी स्वीकारुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यावा का, या प्रश्नावर एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले आहे. राजीनामा द्यायचा की नाही हा सर्वस्वी एकनाथ शिंदे यांचा प्रश्न असल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

(हेही वाचाः महाराष्ट्रातील राजकीय पेचावर राऊतांचं मोठं ट्वीट, ‘मविआ’ सरकार होणार बरखास्त?)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here