शिवसेनेतून ४० आमदार फोडून बाहेर पडलेले शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यावर भाजपाने त्यांना मुख्यमंत्री बनवले. गुरुवारी, ३० जून रोजी शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
राजभवनात हा शपथविधी सोहळा झाला. यावेळी राज्यपालांनी शिंदे आणि फडणवीस यांना गोपीनियतेची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कुटुंब यावेळी उपस्थित होते. तसेच या राजभवनात शिवसेना आणि भाजपाचे नेते उपस्थितीत होते.
Join Our WhatsApp Community