Raigad चे पालकमंत्रीपद एकनाथ शिंदेंकडे, मुंबई भाजपच्या खात्यात जाण्याची शक्यता नाही

68
Raigad चे पालकमंत्रीपद एकनाथ शिंदेंकडे, मुंबई भाजपच्या खात्यात जाण्याची शक्यता नाही
Raigad चे पालकमंत्रीपद एकनाथ शिंदेंकडे, मुंबई भाजपच्या खात्यात जाण्याची शक्यता नाही

महायुती सरकारमध्ये पालकमंत्रीपदांवरून सुरू झालेल्या अंतर्गत संघर्षाने आता गंभीर वळण घेतले आहे. रायगड आणि नाशिक या दोन महत्त्वाच्या जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदांवरून शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्यात तणाव निर्माण झाला आहे. रायगडचा मुद्दा अधिक चिघळला असून, स्थानिक पातळीवर आंदोलनं आणि असंतोष उफाळून आला आहे. (Raigad)

रायगडमध्ये राष्ट्रवादीचे वर्चस्व संपुष्टात?

राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे यांना रायगडच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, शिवसेनेचे भरत गोगावले यांचे समर्थक यावर आक्रमक झाले. त्यांनी आंदोलनं, रास्तारोको आणि पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे देण्यासारखे पावले उचलली, त्यामुळे सरकारला अवघ्या २४ तासांत रायगड आणि नाशिक पालकमंत्रीपदाला स्थगिती द्यावी लागली. (Raigad)

(हेही वाचा- Dadar Fraud Case : दादरमधील व्यवसायिकला भागीदारीचे आमिष दाखवून फसवले)

शिंदेंच्या हाती रायगड, पण मुंबई भाजपकडे जाणार?

यावर तोडगा काढण्यासाठी भाजपने शिवसेनेला नवा प्रस्ताव दिल्याची चर्चा आहे. रायगडच्या वादावर पडदा टाकण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्याकडे रायगडचे पालकमंत्रीपद देण्याचा विचार केला जात आहे. मात्र, याचा दुसरा परिणाम असा होऊ शकतो की मुंबईचे पालकमंत्रीपद शिंदेंकडून काढून ते भाजपकडे सोपवले जाईल. (Raigad)

मुंबई शिवसेनेच्या हातातून गेली तर राजकीय अडचण?

जर मुंबईचे पालकमंत्रीपद भाजपकडे गेले, तर याचा परिणाम आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीवर होऊ शकतो. शिवसेनेच्या हातून मुंबई गेली, अशी टीका विरोधकांकडून होऊ शकते आणि त्याचा फायदा राष्ट्रवादी-काँग्रेस व शिवसेना (उबाठा) घेतल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसाठी हा निर्णय घेताना मोठा पेच निर्माण झाला आहे. (Raigad)

(हेही वाचा- Washington DC Plane Crash : सर्व प्रवाशांचा मृत्यू ?; आतापर्यंत २८ मृतदेह हाती)

नाशिकचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही

रायगडप्रमाणेच नाशिकमधील पालकमंत्रीपदावरूनही गोंधळ सुरु आहे. भाजपचे गिरीश महाजन यांच्याकडे हे पद देण्यात आले होते, पण आता या मुद्द्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निर्णय घ्यावा लागणार आहे. (Raigad)

भरत गोगावले आक्रमक – शिवसेनेला नवी ताकद?

गुरुवारी चेंबूरमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात मंत्री भरत गोगावले यांनी इशारा दिला की, “भरतशेठने दिलेले मंत्रीपद थांबवले आहे, पण लवकरच रायगडचा योग्य निर्णय होईल.” यावरून स्पष्ट होते की शिवसेना (शिंदे गट) आपल्या ताकदीच्या जोरावर रायगड जिंकण्यासाठी लढत आहे. (Raigad)

(हेही वाचा- महालक्ष्मीच्या श्लोकाने संबोधनाला सुरुवात; अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी PM Narendra Modi काय म्हणाले ?)

भाजपच्या डावपेचात शिंदे गट सापडणार?

भाजपकडून रायगड शिंदेंना देण्याचा पर्याय समोर ठेवला जात असला तरी त्याबदल्यात मुंबईचा पालकमंत्रीपद काढून घेण्याचा विचार आहे. त्यामुळे शिवसेनेच्या हातातून मुंबई गेल्यास शिंदे गट कमकुवत होऊ शकतो का? हा मोठा प्रश्न आहे. (Raigad)

महायुतीतील अंतर्गत लढाई महत्त्वाची ठरणार

हा वाद जर वेळीच सोडवला नाही, तर याचा परिणाम येत्या विधान परिषद आणि महानगरपालिका निवडणुकांवर होऊ शकतो. भाजपने शिंदेंना रायगड देऊन मुंबई हिसकावण्याचा डाव आखल्यास महायुतीच्या स्थिरतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते. (Raigad)

(हेही वाचा- Champions Trophy 2025 : रोहित शर्मा अखेर पाकिस्तानला जाणार नाही)

आता मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे-पवार या वादावर कसा तोडगा काढतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (Raigad)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.