महाराष्ट्रात महायुतीचे सरकार स्थापन झाले तेव्हापासूनच आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा संजय राऊत आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना गट करत आहे. मात्र, त्यांना आतापर्यंत योग्य ज्योतिषी मिळाला नसल्याचे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पलटवार केला आहे. त्यांनी आता नवीन ज्योतिषी शोधावा, असा सल्ला देखील एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील आरोप प्रत्यारोप वाढले आहेत. (Eknath Shinde)
लोकसभेच्या निकालानंतर सत्ता स्थापनेच्या दावा करण्यापूर्वी एनडीएमधील सर्व घटक पक्षांची बैठक दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित आहेत. तत्पूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी सर्व घटक पक्ष एनडीए सोबत असल्याचा मुख्यमंत्री शिंदे यांनी केला आहे. नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान होत आहेत. ही देशासाठी गर्वाची बाब असल्याचे देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. याबरोबरच त्यांनी उद्धव ठाकरे गटावर देखील जोरदार टीका केली. आमचे आमदार त्यांच्या संपर्कात असल्याचा दावा केला जातोय. मात्र, त्यांना अजून योग्य ज्योतिषी मिळाला नाही. त्यांनी नवीन ज्योतिषी शोधावा, असा सल्ला त्यांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे. (Eknath Shinde)
(हेही वाचा – Ajit Pawar: आम्हीच कुठेतरी कमी पडलो, बारामतीच्या निकालाचे आश्चर्य व्यक्त करत अजित पवार म्हणाले…)
शिंदे गटाचे आमदार नाराज
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला लोकसभा निवडणुकीत हवे तसे यश प्राप्त करता आले नाही. त्यामुळे आता शिंदे गटाचे आमदार नाराज असून ते लवकरच उद्धव ठाकरे यांच्याकडे परतणार आहेत. त्यांचा पक्षप्रवेश सोहळा होणार असल्याचा दावा उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत यांच्या या दाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. उद्धव ठाकरे यांना अद्याप योग्य ज्योतिषी मिळाला नसल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे तसेच त्यांनी आता नवीन ज्योतिषी शोधावा, असा सल्लादेखील शिंदे यांनी दिला आहे. (Eknath Shinde)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community