जे फडणवीसांना नाही जमले ते शिंदे यांनी करून दाखवले

98

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील विविध ठिकाणी तुंबलेल्या पाण्याचा तसेच आपत्कालिन परिस्थितीचा आढावा महापालिका आपत्कालिन नियंत्रण कक्षाला भेट देत घेतला. या पाहणीनंतर शिंदे यांनी महापालिका मुख्यालयातील भाजप पक्ष कार्यालयाला भेट दिली. राज्यात भाजप-शिवसेना युतीचे सरकार आल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री बनले होते, परंतु पाच वर्षांमध्ये फडणवीस हे महापालिका मुख्यालयात अनेकदा आले परंतु ते एकदाही भाजपच्या मुख्यालयात आले नाही. पण शिंदे यांनी मुख्यमंत्री बनल्यानंतर भाजपच्या नेत्यांचा आग्रहाखातर महापालिकेतील पक्ष कार्यालयाला भेट देत जे फडणवीस यांना जमले नाही, ते शिंदे यांनी करून दाखवले.

( हेही वाचा : NDRF आणि SDRF तैनात! अतिवृष्टीत मदत कार्यासाठी यंत्रणांना सज्ज राहण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश)

भाजप पक्ष कार्यालयात भेट

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर आपत्कालिन नियंत्रण कक्षात भेट देत आढावा घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. त्यानंतर भाजपचे महापालिका माजी गटनेते प्रभाकर शिंदे आणि पक्षनेते विनोद मिश्रा यांच्या आग्रहाखातर महापालिका मुख्यालयातील भाजप पक्ष कार्यालयात भेट दिली. आपल्या पुढील नियोजित दौऱ्याला निघालेल्या शिंदे यांनी भाजपच्या या नेत्यांना नाराज न करत कार्यालयात हजेरी लावली. यावेळी भाजप महापालिका पक्ष कार्यालयाच्यावतीने माजी गटनेते प्रभाकर शिंदे, पक्षनेते विनोद मिश्रा आणि प्रवक्ते भालचंद्र शिरसाट यांच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा भेट देत त्यांचा सत्कार केला. काही क्षण कार्यालयात बसून त्यांनी नेत्यांशी संवादही साधला. मात्र, यापूर्वी भाजपच्या सरकारमध्ये फडणवीस हे मुख्यमंत्री पदी असतानाही ते भाजपच्या महापालिका कार्यालयात कधी आले नव्हते, परंतु नव्या शिवसेना भाजपच्या युतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पदस्पर्श महापालिका भाजप कार्यालयाला झाला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.