Sharad Pawar यांच्या Shinde स्तुतीमुळे उबाठामध्ये अस्वस्थता!

37
Sharad Pawar यांच्या Shinde स्तुतीमुळे उबाठामध्ये अस्वस्थता!
  • खास प्रतिनिधी 

राष्ट्रवादी काँग्रेस (शप) गटाचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांनी उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांचे नवी दिल्ली येथे एका कार्यक्रमात कौतुक केले आणि महाराष्ट्रात वांद्रयाला आग लागली. शिंदे यांच्यावर स्तुतीसुमने उधळली गेली आणि तीही शरद पवार यांच्याकडून, त्यामुळे शिवसेना उबाठामध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली आहे.

मंगळवारी ११ फेब्रुवारी २०२५ या दिवशी दिल्लीतील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात एकनाथ शिंदे यांना शरद पवारांच्या (Sharad Pawar) हस्ते ‘महादजी शिंदे राष्ट्रीय पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी पवारांनी एकनाथ शिंदेंचं कौतुकही केलं. एकनाथ शिंदे यांच्यामुळे ठाण्याचं राजकारण योग्य दिशेने गेल्याचं पवार म्हणाले.

शिंदेंना समस्यांची जाण

“नागरी प्रश्नांची, समस्यांची जाण असलेला नेता कोण, याची माहिती घेतली तर त्यासाठी एकनाथ शिंदेंचं नाव घ्यावं लागेल. ठाणे, ठाणे महानगरपालिका, मुंबई येथील समस्यांची त्यांना जाण आहे. राज्याचे मुख्यमंत्री यांनाही जाण आहे. योग्य दिशा द्यायचं काम त्यांनी सातत्याने केलं. हे करत असताना विविध क्षेत्रातील लोकांशी सुसंवाद ठेवून प्रश्नाचा तोडगा काढण्याचं काम त्यांनी केलं. याची नोंद महाराष्ट्राच्या राजनीतीच्या इतिहास राहील. त्यानिमित्ताने त्यांचा सन्मान होतोय, याचा मला आनंद आहे”, असे कौतुकोद्गारही त्यांनी काढले.

(हेही वाचा – शिवाजीनगर बसस्थानक पुनर्बांधणीला गती; DCM Ajit Pawar यांनी घेतला आढावा)

पवारांनी जायला नको होते

यावर शिवसेना उबाठाचे मुखपत्र दैनिक ‘सामना’त अग्रलेख लिहून शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका केली. राऊत यांनी तर पवार यांनी त्या कार्यक्रमाला जायला नको होते, असे सांगून शरद पवार यांनीही उबाठाचे धोरण अवलंबवावे अशी अपेक्षा व्यक्त केली. बुधवारी १२ फेब्रुवारी २०२५ ला सकाळीच शिवसेना उबाठाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना उसने अवसान आणत, ठाण्यावर शिवसेनेचे कसे प्राबल्य आहे ते सांगण्याचा प्रयत्न केला आणि राजन विचारे यांच्याकडे बोट दाखवले.

शिंदे ठाण्याच्या राजकारणात उशीरा आले!

संजय राऊत म्हणाले, “कदाचित शरद पवारांकडे (Sharad Pawar) चुकीची माहिती आहे. ठाण्याचं राजकारण योग्य दिशेने नेण्याचं काम गेल्या तीस वर्षांत शिवसेनेने केलं. ठाण्याचा विकास सतीश प्रधान यांनी केली. त्यांनी टेंडरबाजी केली नाही. एकनाथ शिंदे ठाण्याच्या राजकारणात फार उशीरा आले. शरद पवारांना माहिती हवी असेल तर आमचे राजन विचारे त्यांना माहिती पुरवतील. आम्ही त्यांना सर्व फाईल्स घेऊन पाठवू. एकनाथ शिंदे फार उशिरा आमदार झाले अन् विधानसभेत आले. त्यानंतर ठाण्याची वाट लागायला सुरुवात झाली,” अशी टीका राऊत यांनी शिंदे यांच्यावर केली.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.