एकनाथ शिंदे देणार मंत्रिपदाचा राजीनामा?

विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर शिवसेनेच्या ३५ आमदारांना घेऊन गुजरातमध्ये गेलेले शिवसेना नेते, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडाचे निशाण फडकावले. त्यामुळे ठाकरे सरकार आता पडणार असे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शिंदे यांची शिवसेनेने तडकाफडकी गटनेतेपदावरून हटवले. तसेच एकनाथ शिंदे हे मंत्रिपदाचाही राजीनामा देणार आहेत.

शिवसेनेला जबर फटका 

एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्यात राजकीय भूकंप झाला आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत ३५ आमदार आहेत. त्यामुळे भाजपाकडे आता ११६ सोबत जर शिवसेनेच्या ३५ आमदारांचा गट मिळाला तर भाजपाकडे स्पष्ट बहुमत निर्माण होईल. एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांचे समर्थक आमदारही संपर्कात नाही. त्यानंतर हे सर्व गुजरातच्या सुरत येथे असल्याचे समोर आले. मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर शिवसेनेला जबर धक्का बसला. वर्षावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बैठक बोलावली. या बैठकीला केवळ १८ आमदारांनी उपस्थिती लावली. या बैठकीत एकनाथ शिंदे यांची गटनेते पदावरून हकालपट्टी करण्यात आली. शिंदे यांच्याजागी अजय चौधरी यांना जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र आता एकनाथ शिंदे आणि समर्थक मंत्री संध्याकाळपर्यंत राजीनामा देणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. सध्या सुरत येथे भाजपा नेते आणि एकनाथ शिंदे यांच्या चर्चा सुरू आहे. काही वेळाने याठिकाणी अमित शाह आणि देवेंद्र फडणवीसही पोहचणार आहेत. त्यामुळे राज्यात राजकीय उलथापालथ होणार असल्याचे दिसून येत आहे. त्यात वर्षावर गेलेल्या आमदारांपैकी तिघांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादीसोबत राहणे कठीण आहे, भाजपासोबत चला, असे त्यांनी उद्धव ठाकरेंना स्पष्टपणे सांगितले आहे.

(हेही वाचा ठाकरे सरकार पाडण्यासाठी एकनाथ शिंदेच का?)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here