१९९५ मध्ये शिवसेना-भाजपा युतीच्या सरकारचे मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत चर्चा करून तब्बल ६० योज़नांची घोषणा केली होती, त्या सर्व योजना आम्ही राज्यात राबवणार आहोत, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. मुख्यमंत्री शिंदे यांनी गुरुवारी, २८ जुलै रोजी माजी मुख्यमंत्री, शिवसेना नेते मनोहर जोशी यांची भेट घेतली. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.
युतीच्या काळातील योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचवणार
या भेटीच्या दरम्यानच्या मनोहर जोशी यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना युतीच्या काळात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या ६० योजना आखून दिल्या होत्या, त्याचे पुस्तक जोशी यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना देत, या योजना राबवण्यास सांगितले. हा धागा पकडून मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आपण मनोहर जोशी यांची सदिच्छा भेट घेतली, त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत काम केले आहे. त्यावेळी प्रमुख नेत्यांपैकी एक मनोहर जोशी होते. त्यांचे मार्गदर्शन नेहमीच कामी येईल. युती सरकारमध्ये जोशी मुख्यमंत्री झाले होते, तेव्हा त्यांनी बाळासाहेबांशी चर्चा करून ६० योजना घोषित केल्या होत्या, त्यांचे पुस्तक त्यांनी मला दिले. त्या योजना चांगल्या आहेत, त्या सर्वसामान्यांपर्यंत पोहचल्या पाहिजेत यासाठी आमचे सरकार त्यासाठी प्रयत्न करेल, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
(हेही वाचा शिवसेनेच्या वेबसाईटवरून राष्ट्रीय कार्यकारिणी ‘बरखास्त’! उरली फक्त घराणेशाही)
भेटीमागे कुठलाही राजकीय हेतू नाही
थोरा-मोठ्यांचे आशीर्वाद आम्हाला हवे आहेत, आम्हाला राज्याचा सर्वांगीण विकास करायचा आहे. राज्यातील प्रत्येकाला न्याय देण्याचे काम हे सरकार करेल. युती सरकारच्या काळातील ६० योजना आमचे सरकार राबवणार आहे. या भेटीमागे कुठलाही राजकीय हेतू नाही. कुठलाही राजकीय अर्थ काढू नका. याआधी शिवसेना नेते लीलाधर डाके यांचीही भेट घेतली. लीलाधर डाके असो की मनोहर जोशी, या सगळ्यांनी बाळासाहेबांसोबत काम केले आहे. आम्हीही शिवसेनाप्रमुखांसोबत काम केले आहे, अशी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
Join Our WhatsApp Community