गेल्या काही दिवसांपासून अस्थिर झालेल्या राज्यातील राजकारणात गुरुवारी एक वेगळाच ट्विस्ट आला. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रं हाती घेतल्यानंतर ठाकरे सरकारचा मेट्रो कारशेडचा निर्णय बदलला आहे. त्यातच आता एकनाथ शिंदे राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीसाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना नवीन यादी पाठवणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे ठाकरे सरकारसाठी हा मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.
(हेही वाचाः शिवसेनेला बाजूला ठेऊन शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही, उद्धव ठाकरेंचा निशाणा)
शिंदे सरकार देणार नवीन यादी
शिवसेना,काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या 12 उमेदवारांच्या नावांची यादी विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त सदस्यांसाठी महाविकास आघाडीकडून देण्यात आली होती. पण या यादीवर राज्यपालांनी आक्षेप नोंदवत कुठलाही निर्णय घेतला नव्हता. यावरुन मोठे राजकारण रंगल्यानंतर आता शिंदे सरकारने या यादीऐवजी नवीन यादी पाठवण्याचा निर्णय घेतल्याचे बालले जात आहे. त्यामुळे राज्य सरकार आता ठाकरेंना आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा होत आहेत.
मेट्रो कारशेड आरेमध्येच
मेट्रो कारशेड आरेऐवजी कांजुरमार्ग येथे हलवण्याचा निर्णय मागील ठाकरे सरकारने घेतला होता. पण शिंदे सरकार सत्तेत येताच त्यांनी हा निर्णय बदलत मेट्रो कारशेड आरेतच होणार असल्याचे जाहीर केले. ज्याठिकाणी कारशेडचे 25 टक्के काम पूर्ण झाले आहे तिथेच कारशेड उभारणे मुंबईकरांच्या हिताचे असल्याचे फडणवीस यांनी म्हटले. त्यावरुन उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर शुक्रवारी टीका केली आहे.
(हेही वाचाः ‘मला दुःख झालं आहे’, मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतर उद्धव ठाकरेंचा पहिला संवाद)
Join Our WhatsApp Community