Eknath Shinde: कायद्यापेक्षा स्वत:ला मोठे समजू नका; मुख्यमंत्र्यांनी जरांगे पाटलांना सुनावले

सोमवारपासून राज्याचे अधिवेशन सुरू होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली.

308
Eknath Shinde: कायद्यापेक्षा स्वत:ला मोठे समजू नका; मुख्यमंत्र्यांनी जरांगे पाटलांना सुनावले
Eknath Shinde: कायद्यापेक्षा स्वत:ला मोठे समजू नका; मुख्यमंत्र्यांनी जरांगे पाटलांना सुनावले

मनोज जरांगे यांनी ज्या मागण्या केल्या त्या पूर्ण करण्यासाठी सरकारने प्रयत्न केले. जो शब्द आम्ही दिला तो आम्ही पूर्ण केला, परंतु जरांगे यांची आजची भाषा राजकीय वाटू लागली आहे. सरकार म्हणून इगो ठेवला नाही, पण त्यांनी अशी भाषा वापरण्याची गरज नव्हती. प्रत्येकाने आपल्या मर्यादेत बोलले पाहिजे. कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही, आम्ही संयम ठेवला आहे, त्या संयमाचा अंत पाहू नका, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी जरांगेंना दिला आहे.

सोमवारपासून राज्याचे अधिवेशन सुरू होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी जरांगेंवर केलेल्या आरोपावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल चढवलाय

मुख्यमंत्री यावेळी बोलले की, जरांगे पाटील प्रामाणिक भावना ठेवून लढ्यात उतरले होते, पण त्यावेळी त्यांनी वेळोवेळी मागण्या बदलल्या. मी त्यांना भेटायला जालन्याला गेलो. असे सांगून ते पुढे म्हणाले की, जरांगेंची आता जी भाषा आहे ती राजकीय आहे. त्यांच्या मागे कोणीतरी असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. उपमुख्यमंत्र्यांबाबत जरांगे यांनी केलेलं वक्तव्य योग्य नसल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले. आमचं सरकार शेतकरी, महिला, पायाभूत सुविधांना सरकारचं प्राधान्य देत आहे, मात्र विरोधकांना राजकारणातच अधिक रस असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

(हेही वाचा – Prime Minister Narendra Modi: पंतप्रधानांनी गुजरातमधील द्वारका येथे केले विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन)

कायदा हातात घेऊ नये…
मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानासमोर आंदोलन करणार आहेत. याबाबत विचारले असता, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, कायदा-सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आमची आहे. त्यांनी संयम पाळावा. कायदा हातात घेऊ नये. आंदोलनकर्त्यांनी जाणीव ठेवली पाहिजे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

संभ्रम पसरवून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करू नये
महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे. सरकारने मराठा आणि ओबीसी समाजाबाबत मोठे निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. धनगर समाजाबाबतही आम्ही निर्णय घेतला आहे, असेही ते म्हणाले. त्यामुळे कोणीही संभ्रम पसरवून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करू नये.

सरकार गतीमानतेने काम करत आहे
राज्यात चांगले काम होत आहे. त्यामुळे विरोधकांची पोटदुखी वाढत आहे. राज्यात सर्वाधिक पायाभूत सुविधा प्रकल्प निर्माण होत आहेत. सरकार गतीमानतेने काम करत आहे. सर्व क्षेत्रात आपण प्रगती करत आहोत. अटल सेतुचं उद्घाटन झाल्याने राज्यात मोठा प्रकल्प कार्यान्वित झाला. मराठा आरक्षणालाही न्याय मिळाला. सुप्रीम कोर्टात आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही सुप्रीम कोर्टाने काढलेले निरीक्षण विचार करून मोठ्या प्रमाणात सर्वेक्षण करून मराठा आरक्षण देण्यात आले.

जरांगे जे बोलले ते बिनबुडाचे…
यादरम्यान पत्रकार परिषदेत फडणवीस म्हणाले की, सागर बंगल्यावर कोणीही येऊ शकतं. जरांगे जे बोलले ते बिनबुडाचे आहे. मराठा समाजासाठी मी काय केले हे मराठा समाजालाही माहित आहे. जरांगे यांना काय साध्य करायचे आहे. ज्या स्क्रिप्टवर उद्धव ठाकरे आणि शरद पवार बोलत होते. तीच स्क्रिप्ट जरांगे यांनी का वाचावी, असा प्रश्न माझ्यासमोर आहे, असे विधान करून जरांगे यांच्या विधानाला फडणवीसांनी प्रत्युत्तर दिले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.