ईडी, सीबीआयची चौकशी लागली म्हणून यांची बोंब सुरू झाली आहे. मुंबई महापालिकेत भ्रष्ट्राचार झाला म्हणून बोंबलत सुटले आहेत. पण या चोरांच्या उलट्या बोंबा आहेत. मुळात त्यांनी मोर्चा चुकीच्या ठिकाणी काढला आहे. खरा मोर्चा मातोश्री-१, २ वर निघायला हवा हातो. कारण त्यांना माहित आहे. सगळे तिथेच घडले आहे, असा पलटवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.
ठाकरे गटाच्या वतीने मुंबईत काढण्यात आलेल्या विराट मोर्चाला प्रत्युत्तर देताना एकनाथ शिंदे म्हणाले की, बुलडोझर आम्ही चालवणार आहोत; त्यामुळे आमच्या बुलडोझरला घाबरून त्यांनी मोर्चा काढला. गेल्या २५ वर्षांपासून त्यांनी मुंबईकरांची लूट केली आहे. मुंबईकरांचा पैसा आम्ही मुंबईकरांच्या सेवेसाठीच लावणार आहे. सगळा भ्रष्ट्राचार त्यांनी केला आहे, असा आरोपही शिंदे यांनी केला.
(हेही वाचा – ठाकरेंची साथ सोडल्यानंतर राहुल कनाल म्हणाले, पक्षाने मला भरपूर दिले, पण मीही…)
ईडी आमची नव्हे, केंद्र सरकारची…
आज भाजपा आणि शिवसेना युतीचा मोर्चाही होता. मात्र, बुलढाण्यात झालेल्या अपघातामुळे आम्ही तो थांबवला. आम्ही संवेदनशील आहोत. परंतु, त्यांना राजकारण करायचे आहे. कोरोनाकाळातील भ्रष्टाचार बाहेर येत असल्यामुळे मोर्चा काढत आहेत. ईडी आमची थोडीच आहे. ती केंद्र सरकारची आहे, असा हल्लाबोल एकनाथ शिंदे यांनी केला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community