
स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा (Kunal Kamra) आणि वाद हे जुनं समीकरण असून आता त्याच्या एका व्हिडीओमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. एका शोमध्ये कुणालने महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करत एक विडंम्बनात्मक गाण सांदर केलं. त्यामध्ये त्याने नाव न घेता अप्रत्यक्षरित्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. या प्रकरणावर दिवसभरात सर्वांच्या प्रतिक्रिया समोर आल्या होत्या. पण खुद्द एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देणं टाळलं. अखेर त्यांनी एका मराठी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पहिली प्रतिक्रिया दिली आहे. (Kunal Kamra)
एकनाथ शिंदे म्हणाले, “मी आरोपांवर उत्तर देत नाही. मी आरोपांवर कामाने उत्तर देतो. त्याचा फायदा आरोप करणाऱ्यांना लोकांनी घरी बसवलं आणि काम करणाऱ्यांना लोकांनी सत्ता दिली. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरअर्थ आणि गैरफायदा घेण्यात आला. मी विडंबन समजू शकतो. विडंबन अनेक कवी करायचे. पण हे व्यभिचार, स्वैराचार आणि सुपारी घेऊन बोलण्याचं काम आहे. माझ्यावरील आरोपांकडे मी दुर्लक्ष केलं. मी यासंदर्भात कोणालाही प्रतिक्रिया दिली नाही.” (Kunal Kamra)
हेही वाचा- MP salary : खासदारांना भरघोस पगारवाढ ; माजी खासदारांचेही पेन्शन वाढले
“पण कार्यकर्त्यांच्या भावना असतात. पण याच माणसाने सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांच्याबाबत काय म्हटलंय बघा, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत काय म्हटलंय, लाडकी बहीण अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याविषयी काय म्हटलंय बघा. हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाहीय. हे कोणाची सुपारी घेऊन आरोप केलेले आहेत, त्यामुळे मी काही रिॲक्ट झालो नाही.” (Kunal Kamra)
हेही वाचा- धारावी बस डेपो शेजारी Gas Cylinder च्या ट्रकला आग, एका पाठोपाठ एक सिलिंडरचे स्फोट
“मी याविषयावर बोललोच नाही. मी बोलणारच नाही. मी काम करणारा माणूस आहे. मी संवेदनशील आहे, माझ्यात सहन करण्याची ताकद आहे. मी कधीही कोणावरही रिॲक्ट होत नाही, मी शांत राहणं, आपलं काम करणं, आपला फोकस कामावर केंद्रित करणं आणि लोकांना न्याय देणं योग्य मानतो.” असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. (Kunal Kamra)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community