राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर विरोधकांनी ईव्हीएमला (EVM) विरोध करण्यास सुरुवात केली आहे. महाविकास आघाडीकडून बॅलेट पेपरवर मतदान प्रक्रिया घेतली जावी, अशी मागणी सातत्याने केली जात आहे. नुकतंच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी मारकडवाडीत जाऊन गावकऱ्यांची भेट घेतली. यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शरद पवारांना सल्ला दिला आहे. तुम्ही ज्येष्ठ नेते आहात, किमान देशातील जनतेची दिशाभूल करू नका, असे फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना सुनावले. (Eknath Shinde)
हेही वाचा-रशिया-युक्रेनमध्ये भारताच्या माध्यमातून चर्चा; S. Jaishankar यांची माहिती
#Live | 08-12-2024
📍विधान भवन, मुंबई🎥 पत्रकारांशी संवाद
https://t.co/pGcM2Tjtwb— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) December 8, 2024
आता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शरद पवारांना थेट सवाल केला आहे. “तुम्हाला विजय मिळतो. तुम्हाला जागा जास्त मिळतात तेव्हा ईव्हीएम चांगला असतो. पराभव होतो. तेव्हा ईव्हीएम खराब असतो. सुप्रीम कोर्टापासून निवडणूक आयोगापर्यंत त्यांच्या बाजूने निकाल लागला तर यंत्रणा चांगली. विरोधात निकाल गेला तर कोर्टावरही आरोप केले. यापूर्वीच झारखंड, कर्नाटकात मतदान झालं. लोकसभेत झालं. प्रियांका गांधीही जिंकल्या. जेव्हा आपण हरतो, तेव्हा ईव्हीएम घोटाळा म्हणायचं. जेव्हा जिंकतो तेव्हा बॅलेट पेपरची कोणी मागत नाही. हा दुटप्पीपणा आहे. विरोधीपक्षाकडे कोणताही मुद्दा राहिला नाही.”
हेही वाचा-Nashik Bus Accident : नाशिकमध्ये भीषण अपघात! तिघांना चिरडत बस थेट चौकशी कक्षावर धडकली
“मी म्हणालो होतो विरोधकांना लाडक्या बहिणी चार महिन्यात चीत करेल. सर्व घटकांनी विरोधकांना जागा दाखवली. घरी बसणाऱ्यांना लोकं मतदान करत नाही. काम करणाऱ्यांना, फिल्डवर असणाऱ्यांना मतदान करतात. लोकसभेत दोन लाखांचा फरक असून त्यांना जागा जास्त असून त्यांचे उमेदवार जास्त आले. आम्हाला १७ जागा आणि महाविकास आघाडीला ३१ जागा मिळाल्या. हा ईव्हीएम घोटाळा झाला म्हणायचा का ? वेळी त्यांनी काही आक्षेप घेतला नाही. मी पवारांचं ऐकत होतं. काँग्रेसने १०० पेक्षा जास्त लढवल्या. आम्ही ८० जागा लढवल्या. प्रत्येक मतदारसंघात वेगवेगळं गणित आहे. कोणी एक हजाराने निवडून आला. आमच्या ८ ते १० जागा हजार बाराशे मतांनी पराभूत झाल्या. मग आमच्या ७० जागा झाल्या असत्या. तेव्हा तर गहजब केला असता.” असं प्रत्त्युत्तर शिंदेंनी (Eknath Shinde) दिलं.
“लोकशाही मार्गाने झालेल्या निवडणुका जनतेने आमचं अडीच वर्षाचं काम पाहिलं. मी पुन्हा पुन्हा सांगायची गरज नाही. महाविकास आघाडीने बंद पाडलेले प्रकल्प आम्ही वेगाने पूर्ण केले. लाडक्या बहिणीपासून अनेक योजना केल्या. त्याची पोचपावती मिळाली. त्यामुळे विरोधकांना आवाहन आहे हे रडगाणं थांबवा. आता विकास गाणं सुरू करा. नाना पटोले जिंकले. ११२ मतांनी जिंकले. रोहित पवार जिंकले. त्यात काय ईव्हीएम घोटाळा झाला का. कुणाला काही वाटेल म्हणून निर्णय घेऊ शकतो का. काही नियम ठरले आहेत. आयोग आहे आणि घटना आहे. लोकांचा कौल स्वीकारला पाहिजे. रडीचा डाव बंद केला पाहिजे. जनतेने कौल दिला आहे. पुन्हा गिरेंगे तो टांग उपर असा प्रकार आहे.” असं शिंदे (Eknath Shinde) म्हणाले आहेत.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community