मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कॅशचं गोडाऊन (Cash Godown) सापडलं होतं, अशी टीका आदित्य ठाकरेंनी (Aaditya Thackeray) केली होती. आदित्य ठाकरेंच्या या दाव्यावर एकनाथ शिंदेंनी प्रत्युत्तर दिलं. ”जनतेला माहीत आहे एकनाथ शिंदे कोण आणि माझी काय कमाई आहे. कोणी तरी म्हटले खोके नाही कंटेनर लागतात, कंटेनर कुठे गेले तेही माहीत आहे. दोन वर्षानंतर हा शोध लावला. खोके मोजल्याशिवाय झोप येत नाही ते आमच्यावर आरोप करत आहेत. आमच्याकडे कोणती प्रॉपर्टी नाही, काही नाही आम्हाला लोकांची सेवा करायची. मला जास्त बोलायला भाग पाडू नका. असे विधान ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भर सभेत केले. (CM Eknath Shinde)
(हेही वाचा – India Military Spending : संरक्षणावर खर्च करण्याच्या बाबतीत भारत जगात चौथ्या क्रमांकावर )
प्रचाराच्या तोफा बुधवार संध्याकाळ पर्यंत थंडावणार
लोकसभेच्या (Loksabha election 2024) दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील ८ मतदारसंघांसह देशातील ८९ जागांसाठी शुक्रवारी मतदान होणार असून, त्यासाठी दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा बुधवार संध्याकाळ पर्यंत थंडावणार आहेत. शेवटच्या दिवशी अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी आज सर्वच पक्षीय नेत्याच्या प्रचार सभा होणार आहेत. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंगोली जिल्ह्यातील वसमतमध्ये (Hingoli Vasmat Lok Sabha Election) महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर (Baburav Kadam Kohalikar) यांच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन करण्यात आले होते. यामध्ये उबाठा गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा चांगलाच खरपूस समाचार घेण्यात आला. (CM Eknath Shinde)
(हेही वाचा – IRCTC: आता जनरल डब्ब्यामध्ये स्वस्त दरात जेवण मिळणार, तर ३ रुपयांत पाणी)
बाप एक नंबरी, बेटा १० नंबरी
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसभांचा धडाका सुरू असून, सत्ताधारी पक्ष व विरोधी पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैऱ्या सुरू आहेत. तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाही लक्ष्य केले होते. त्यानंतर, हिंगोलीतील सभेतून मुख्यमंत्री शिंदेंनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे. बाप एक नंबरी, बेटा १० नंबरी असल्याचा प्रखर बाण शिंदेंनी हिंगोलीतील सभेतून चालवला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरे ठाकरे यांच्यासह काँग्रेस आणि महाविकास आघाडीवर टीका
हिंगोली जिल्ह्यातील वसमतमध्ये महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही सभा पार पडली. या सभेमध्ये बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरे ठाकरे यांच्यासह काँग्रेस आणि महाविकास आघाडीवर टीका केली. भाषणाच्या सुरुवातीलाच आमदार राजू नवघरे यांच कौतुक करताना या मतदारसंघात असेलेले प्रश्न सोडवायला पाहिजे, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले. (CM Eknath Shinde)
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community