Uddhav Thackeray यांच्या अडचणी वाढणार? निवडणूक आयोगाने अहवाल मागविला; प्रकरण काय?

227
शिवसेना आणि राष्ट्रवादीचा निर्णय ५० ते ६० वर्षात लागेल; Uddhav Thackeray यांचे न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

लोकसभा निवडणुक मतदानाच्या वेळी केलेले ते विधान उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) भोवणाची शक्यता आहे. मतदानावेळी दिरंगाई केली जात असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर केला होता. याप्रकरणात उद्धव ठाकरेंवर कारवाई होण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केलेल्या आरोपांची शाहनिशा करण्यासाठी निवडणूक आयोगाने (Election Commission) अहवाल मागविला आहे. (Election Commission Action Against Uddhav Thackeray)

आरोपामध्ये काही तथ्य न निघाल्यास उद्धव ठाकरेंवर कारवाई

लोकसभा निवडणुकीच्या वेळी खरंच संश मतदान झालं का? याबद्दल मुंबई, ठाणेमधील जिल्हाधिकाऱ्यांकडून वस्तुनिष्ठ अहवाल मागवण्यात आलाय. जर उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) या आरोपामध्ये काही तथ्य न निघाल्यास उद्धव ठाकरेंवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असं निवडणूक आयोगातील सूत्रांकडून सांगण्यात आलंय. लोकसभा निवडणुकीसाठी मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक या जिल्ह्यांमधील मतदारसंघात 20 मे रोजी मतदान झालं होतं. त्यावेळी मुंबई आणि ठाण्यात संथ मतदानामुळे मतदार केंद्राबाहेर लांबच लांब रांगा असल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केला होता. (Uddhav Thackeray)

निवडणूक आयोगावर ताशेरे ओढले होते

तीव्र उन्हाळा आणि सूर्यदेवाचा कहर अशास्थितीत मतदारांना घराबाहेर पडण कठीण झालं होतं. तीव्र उन्हाळा असूनही मतदारांसाठी निवडणूक आयोगाने कोणतीही व्यवस्था केली नव्हती, असा आरोप मतदारांनी अनेक मतदार केंद्रांवर केला होता. त्यामुळे उद्धव ठाकरेंनीही (Uddhav Thackeray) पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगावर ताशेरे ओढले होते. निवडणूक आयोगावरील उद्धव ठाकरेंच्या आरोपांवरून मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी नाराजी व्यक्त केली होती. एवढंच नाही तर उद्धव ठाकरेंवर कारवाईची मागणीही शेलारांनी केली होती. त्यामुळे आता या आरोपाची दखल निवडणूक आयोगाने घेतली आहे. (Uddhav Thackeray)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.