अजित पवारांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसपेक्षा वेगळी चूल मांडत भाजपबरोबर सत्ता स्थापन केली. (Ajit Pawar Sharad Pawar) त्यानंतर निवडणूक आयोगाकडे (Election Commission) दाखल केलेल्या याचिकेचा ६ फेब्रुवारी या दिवशी निकाल लागला. केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress) पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांच्या गटाला देण्याचा निर्णय घेतला आहे.
(हेही वाचा – Narendra Modi: ‘सपने नही हकिकत बुनते…’ गेल्या १० वर्षांतील मोदींच्या आश्वासनांवर आधारित फिल्म प्रदर्शित)
या निर्णायामुळे शरद पवारांना मोठा राजकीय धक्का बसला आहे. लोकसभा निवडणूक (Lok Sabha Elections) तोंडावर आहे. आता शरद पवार गटाला नवा पक्ष आणि नवे चिन्ह घेऊन निवडणुकांना सामोरे जावे लागत आहे. या निर्णयानंतर आता आमदार अपात्रता निर्णय सुद्धा अजित पवारांच्याच बाजूने जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
EC settles the dispute in the Nationalist Congress Party (NCP), rules in favour of the faction led by Ajit Pawar, after more than 10 hearings spread over more than 6 months.
Election Commission of India provides a one-time option to claim a name for its new political formation… pic.twitter.com/1BU5jW3tcR
— ANI (@ANI) February 6, 2024
या निवडणूक आयोगाच्या (Election Commission) निकालानंतर देवगिरी बंगल्यावर अजित पवार गटाची महत्त्वाची बैठक होत आहे. अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर ही बैठक होत आहे. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री, नेते आणि आमदार उपस्थित राहणार आहेत.
महाराष्ट्रात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ४१ आमदार अजित पवारांसोबत गेले, तर उर्वरित आमदारांनी शरद पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतला. दोन्ही गटांनी पक्षावर दावा सांगितल्याने अखेर हे प्रकरण निवडणूक आयोगासमोर गेले. आयोगासमोर १० वेळा झालेल्या सुनावणीनंतर निवडणूक आयोगाने अजित पवारांचा गट हाच मूळ राष्ट्रवादी पक्ष असल्याचा निर्णय दिला. पक्षाचे चिन्हही त्यांना दिले आहे. (Ajit Pawar Sharad Pawar)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community