निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे गटाला मशाल चिन्ह दिल्यानंतर निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटाला ढाल तलवार हे चिन्ह देण्यात आले. निवडणूक आयोगाने शिंदे गटाचे आधीचे चिन्हासाठीचे पर्याय नाकारून त्यांना दुसरी पर्यायी यादी सादर करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार निवडणूक आयोगाला शिंदे गटाने पिंपळाचे झाड, तळपता सूर्य, ढाल-तलवार हे तीन पर्याय सादर केले होते. त्यानुसार निवडणूक आयोगाने शिंदे गटाला ढाल तलवार हे चिन्ह दिले आहे.
शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ असे नाव दिले
निवडणूक आयोगाला शिंदे गटाने सादर केलेल्या नावांमध्ये शिवसेना बाळासाहेब ठाकरे, बाळासाहेबांची शिवसेना आणि शिवसेना बाळासाहेबांची असे तीन पर्याय दिले होते, यापैकी शिवसेना बाळासाहेब ठाकरे या नावाचा प्रस्ताव ठाकरे गटानेदेखील दिला होता. शिंदे गटाच्या बंडानंतर दोन्ही गटांमध्ये आमचाच गट बाळासाहेबांची शिवसेना आहे, असा दावा करू लागला होता. त्याचे प्रतिबिंब शिंदे गटाने दिलेल्या नावाच्या पर्यायात दिसून आले होते. ठाकरे गटाने पर्यायी तीन निवडणूक चिन्हांचा पर्याय दिला होता. यामध्ये त्रिशुळ, उगवता सूर्य आणि धगधगती मशाल हा पर्याय दिला होता, तर शिंदे गटानेदेखील उगवता सूर्य आणि त्रिशुळ या चिन्हांचा पर्याय दिला होता, त्यातील उद्धव ठाकरे यांना ‘मशाल’ हे चिन्ह देण्यात आले. मात्र शिंदे गटाला वेगळा पर्याय देण्यास सांगितले, त्यानुसार त्यांनी दिलेल्या तीन पर्यायांपैकी ढाल-तलवार चिन्ह देण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community