महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दि. २० नोव्हेंबर रोजी जाहीर झाली. त्यात यावेळी २० लाख ९३ हजार नवमतदार मतदान करणार आहेत. त्यामुळे मतदार यादीत नावे कसे शोधावे, केंद्र नक्की कुठे येणार? याचा शोध कसा घ्यावे हे आपण जाणून घेणार आहोत. (Election Commission)
मतदार यादीत नाव कसे शोधावे? (Election Commission)
मतदार यादीत काही मिनटात आपण नाव शोधू शकता. यासाठी तुम्हाला खालील टप्प्यांचा विचार करावा लागेल.
पहिला टप्पा – निवडणुक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
दुसरा टप्पा- संकेतस्थळावर तुमचे नाव, वडीलांचे नाव, पतीचे नाव, जन्मतारीख, वर्ष, लिंग, राज्य, जिल्हा आणि विधानसभा मतदारसंघ यांच्या माहितीची नोंद करावी.
तिसरा टप्पा – ही सर्व माहिती भरल्यावर कॅप्चा टाकावा.ज्यानंतर मतदार यादीचे पेज उघडेल.
याप्रकारे तुम्हाला महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत २०२४ मध्ये मतदार यादीत नाव आहे का? हे तपासता येईल. (Election Commission)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community