महाराष्ट्राच्या निवडणुकीतील हेलिकॉप्टर तपासणी ते मतदान टक्केवारी; Election Commission ने राजकारण्यांचे कान टोचले

78
महाराष्ट्राच्या निवडणुकीतील हेलिकॉप्टर तपासणी ते मतदान टक्केवारी; Election Commission ने राजकारण्यांचे कान टोचले
महाराष्ट्राच्या निवडणुकीतील हेलिकॉप्टर तपासणी ते मतदान टक्केवारी; Election Commission ने राजकारण्यांचे कान टोचले

दिल्लीतील विधानसभा निवडणुकांची घोषणा करताना मुख्य निवडणुक आयुक्तांनी महाराष्ट्रात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीतील आरोपांवरही प्रतिक्रिया दिली आहे. दिल्लीतील विधानसभा निवडणुक ५ फेब्रुवारी रोजी होणार असून दि. ८ फेब्रुवारी रोजी निकाल जाहीर होणार आहे. यावेळी कुमार यांनी स्टार प्रचारकांची हेलिकॉप्टर तपासणी ते मतदानाची टक्केवारीत सर्व आक्षेपांना उत्तरे दिली आहेत. याशिवाय सर्व राजकरण्यांनी शिष्टाचाराचे पालन केले पाहिजे, असे आवाहनही राजीव कुमार यांनी केली. (Election Commission)

( हेही वाचा : Union Budget मध्ये दिल्लीसाठी केलेल्या योजनांची घोषणा करता येणार नाही; कारण…

मतदार यादीत चुकीच्या नोंदी केल्याच्या आरोपांवर मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार (Rajeev Kumar) म्हणाले की, आरोप ऐकून वाईट वाटते. ही ईव्हीएम (EVM) निवडणूक असल्याचे सांगण्यात आले. मतदार यादीतून नाव वगळल्याच्या तक्रारी आल्या. मतमोजणी संथ गतीने होत असल्याचे सांगण्यात आले. अशा अनेक प्रश्नांवर निवडणुक आयोगाने महाराष्ट्राती राजकारण्यांचे कान उपटले आहेत. (Election Commission)

राजकारण्यांनी शिष्टाचार पाळला पाहिजे

महाराष्ट्राचा संदर्भ देत राजीव कुमार म्हणाले की, हेलिकॉप्टर तपासणीवर आक्षेप घेतला गेला. खरे तर पोलिंग ऑफिसरचे कामच आहे की, सर्वकाही तपासले पाहिजे. राजकारण्यांनी शिष्टाचार पाळला पाहिजे, असे आवाहन आम्ही करतो. खरेतर महाराष्ट्र निवडणुकीच्या वेळी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आयोगाकडून हेलिकॉप्टर तपासणीवर आक्षेप घेत एक व्हिडिओही बनवला होता. यांची संपूर्ण देशात चर्चा झाली होती. याच घटनेचा धागा पकडून मुख्य निवडणुक आयुक्तांनी आज उत्तर दिले. (Election Commission)

जगात कुणाकडेही वेबसाईटवर एवढा डाटा नसेल…

तसेच मतमोजणी केल्यानंतर, विजयाचे अंतर एका मशीनपेक्षा कमी असल्यास व्हीव्हीपॅट मोजले जाते. अन्यथा ते टाकून दिले जाते आणि मोजले जात नाही. याचा निकालावर कोणताही परिणाम होत नाही. निकालाची अचूक माहिती फॉर्म २० मध्ये दिली आहे. तसेच या सर्व गोष्टींची माहिती वेबसाईटवर आहे, प्रत्येक विधानसभेचे मतदान केंद्र, उमेदवार, जगातील कोणत्याही निवडणूक संस्थेकडे इतका डेटा आहे का ते मला सांगा, असा सवाल ही मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी केला. (Election Commission)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.