वायनाडमध्ये तूर्तास पोटनिवडणूक नाही, निवडणूक आयोगाचा राहुल गांधींना दिलासा

102

वायनाड लोकसभा मतदार संघातील काॅंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांचे सदस्यत्व नुकतेच रद्द झाले. त्यानंतर या मतदारसंघात पोटनिवडणूक होईल अशी चर्चा होती, मात्र निवडणूक आयोगाने तूर्तास याठिकाणी पोटनिवडणूक होणार नसल्याचे जाहीर केल्याने राहुल गांधी यांना दिलासा मिळाला आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले की, वायनाड मतदारसंघातून राहुल गांधींचे सदस्यत्व रद्द केल्यानंतर पोटनिवडणुकीची घोषणा करण्यासाठी आमच्याकडे सहा महिन्यांचा कालावधी आहे. त्यामुळे आताच आम्ही घाई करणार नाही. दरम्यान त्यांच्याकडे संबंधित निकालाविरोधात अपील करण्यासाठी ३० दिवसांचा कालावधी आहे.

काय आहे पार्श्वभूमी?

राहुल गांधी यांनी कर्नाटकातील कोलार येथे २०१९ च्या लोकसभा निवडणूक प्रचारसभेमध्ये ‘सर्वच चोरांचे आडनाव मोदी कसे?’ असे विधान केले होते. याचा संदर्भ देत असताना राहुल गांधी म्हणाले होते, “नीरव मोदी, ललित मोदी आणि नरेंद्र मोदी, यांच्या सर्वांच्या नावात मोदी आहे. सर्वच चोरांचे आडनाव मोदी कसे?” राहुल गांधी यांच्या या विधानानंतर सूरतचे भाजप आमदार पूर्णेश मोदी यांनी त्यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. चार वर्षांपूर्वीच्या या खटल्यात सूरतच्या मुख्य न्यायदंडाधिकारी एच.एच. वर्मा यांनी नुकतेच राहुल गांधी यांना दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा सुनावली. दरम्यान न्यायालयाने राहुल गांधी यांना १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आणि या निर्णयाला आव्हान देण्यासाठी ३० दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

(हेही वाचा – कर्नाटक विधानसभा निवडणूक : १० मे रोजी मतदान, ‘या’ तारखेला होणार मतमोजणी)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.