काँग्रेस, भाजपाला Election Commission ची नोटीस

126
काँग्रेस, भाजपाला Election Commission ची नोटीस

बुधवारी, २२ मे रोजी निवडणूक आयोगाने काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांना नोटीस बजावली आहे. आयोगाने दोन्ही पक्षांच्या अध्यक्षांना आणि स्टार प्रचारकांना त्यांच्या भाषणात संयम ठेवण्यास, सावधगिरी बाळगण्यास आणि शिष्टाचार राखण्यास सांगितले. (Election Commission)

लोकसभा निवडणुकीत राहुल गांधींसह काँग्रेसचे नेते आपल्या भाषणात संविधान वाचवण्याचा आणि अग्निवीर योजनेचा वारंवार उल्लेख करत आहेत. तर भाजपा नेते आपल्या भाषणात मुस्लिम आणि धर्मावर भर देत आहेत. आयोगाने दोन्ही पक्षांच्या स्टार प्रचारकांना धार्मिक आणि सांप्रदायिक विधाने करू नयेत असे निर्देश दिले आहेत. (Election Commission)

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : बाबासाहेब आंबेडकर यांचे तिसरे नातू पंजाबमधून मैदानात)

निवडणूक आयोगाने भाजपा आणि काँग्रेसला काय म्हटले?
  • समाजात फूट पडेल अशी प्रचार भाषणे थांबवावीत, असे भाजपाला सांगण्यात आले आहे.
  • निवडणूक आयोगाने काँग्रेसला संविधानाबाबत खोटी विधाने करू नये असे सांगितले. जसे की, भारतीय राज्यघटना रद्द केली जाऊ शकते किंवा विकली जाऊ शकते. याशिवाय, अग्निवीरवर बोलताना निवडणूक आयोगाने काँग्रेसला संरक्षण दलाचे राजकारण करू नका, असे सांगितले. (Election Commission)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.