विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी महायुती, मविआ, मनसेने जाहिरातींवर (NCP Advertisement) भर दिला आहे. निवडणुक प्रचाराच्या तोफा उद्या थंडावणार आहेत. अशातच, अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादीकडून (NCP) नवीन टीव्ही जाहीरात काढण्यात आली होती. मात्र, निवडणूक आयोगाने (Election Commission) जाहिरातीवर (NCP Advertisement) आक्षेप घेतला आहे, व काही ठराविक भाग काढण्याचे आदेश दिले आहेत.
काय आहे जाहिरात ?
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या टीव्ही जाहीरातीत (NCP Advertisement) एक पत्नी आपल्या पतीला राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीच्या योजनांची माहिती देते, आणि शेवटी आता तुम्हीही राष्ट्रवादीला मत द्या. नाहीतर, आज रात्री मी तुम्हाला जेवायला देणार नाही, असे विनोदाने म्हणते. याच दृष्यावर निवडणूक आयोगाने आक्षेप घेतला आहे. एखाद्या विशिष्ट पक्षाला मतदान न केल्यामुळे कुणीही कुणाला अन्न नाकारू शकत नाही, असे निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे.
(हेही वाचा-Reserve Bank of India ला धमकीचा फोन, मुंबई पोलिसांकडून तपास सुरू)
ईसीआयने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यस्तरीय प्रमाणिकरण समितीसमोर निवडणूक प्रचारासाठी आपल्या टीव्ही जाहिरातीच्या पूर्व-प्रमाणिकरणासाठी अर्ज केला होता. राज्याच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी व्हिडिओ जाहिरातीमध्ये दिलेल्या काही भागावर आक्षेप घेतला. पोल बॉडीने जाहिरातीतील एक संवाद ‘पत्नीकडून नवऱ्याला दिलेली धमकी’ असल्याचे म्हटले आहे. (NCP Advertisement)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community