भाजपाच्या निलंबित 12 आमदारांना निवडणूक आयोगाचा दिलासा! भाजपाला होणार फायदा

भाजपाच्या 12 आमदारांचे एका वर्षासाठी निलंबन करण्यात आले होते. याच आमदारांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

144

राज्य सरकारचे दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन गाजले ते भाजपाच्या 12 आमदारांच्या निलंबनामुळे. जुलै महिन्यात पार पडलेल्या या अधिवेशनात आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली होती. यावेळी सभागृहाच्या तालिका अध्यक्षांसोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी भाजपाच्या 12 आमदारांचे एका वर्षासाठी निलंबन करण्यात आले होते. आता याच 12 भाजपा आमदारांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

काँग्रेसचे राज्यसभा खासदार राजीव सातव यांच्या निधनामुळे राज्यसभेतील त्यांची जागा रिक्त आहे. त्यामुळे या रिक्त जागेसाठी पोटनिवडणुका घेण्यात येणार आहेत. या पोटनिवडणुकीसाठी मतदानात सहभाग घेण्याची परवानगी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून भाजपाच्या या 12 निलंबित आमदारांना देण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून तसे आदेश राज्य सरकारला देण्यात आले आहेत. त्यामुळे भाजपाला पोटनिवडणुकीत या 12 आमदारांच्या मतदानाचा फायदा होणार आहे.

(हेही वाचाः ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश राजभवनात का अडकणार? जाणून घ्या)

या 12 आमदारांचे झाले होते निलंबन

  1. डॉ. संजय कुटे (जामोद, जळगाव)
  2. आशिष शेलार (वांद्रे पश्चिम)
  3. अभिमन्यू पवार (औसा, लातूर)
  4. गिरीश महाजन (जामनेर, जळगाव)
  5. अतुल भातखळकर (कांदिवली पूर्व, मुंबई)
  6. पराग अळवणी (विलेपार्ले, मुंबई)
  7. हरिश पिंपळे (मूर्तिजापूर, अकोला)
  8. राम सातपुते (माळशिरस, सोलापूर)
  9. जयकुमार रावल (सिंदखेडा, धुळे)
  10. योगेश सागर (चारकोप, मुंबई)
  11. नारायण कुचे (बदनापूर, जालना)
  12. कीर्तिकुमार भांगडिया (चिमूर, चंद्रपूर)

यांना उमेदवारी

काँग्रेसकडून राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी रजनी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर भाजपाकडून संजय उपाध्याय हे उमेदवार असणार आहेत. ही पोटनिवडणूक 4 ऑक्टोबर रोजी होणार असून, त्याच दिवशी दुपारी मतमोजणी करण्यात येणार आहे.

(हेही वाचाः शिवसेना आमदाराची भाजपा नगरसेविकेच्या वॉर्डात ढवळाढवळ)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.