विधानसभा निवडणुकाः जल्लोष करणा-या कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश

पाच राज्यांच्या हाय व्होल्टेज विधानसभा निवडणुकांचे निकाल सध्या जाहीर होत आहेत. प्राथमिक कलांनुसार पक्षाचे उमेदवार आघाडी- पिछाडीवर असताना कार्यकर्ते मात्र, अंतिम निकालाआधीच विजयाचा जल्लोष करताना दिसत आहेत. अशा कार्यकर्त्यांवर आता कारवाई करण्याचे आदेश निवडणूक आयोगाकडून, संबंधित राज्यांच्या मुख्य सचिवांना देण्यात आले आहेत.

मुख्य सचिवांना दिले आदेश

कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता निवडणुकांच्या निकालांदरम्यान सर्व राज्यांना काही सूचना, निवडणूक आयोगाकडून करण्यात आल्या होत्या. त्यानुसार कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता निकालांदरम्यान मोठ्या प्रमाणावर गर्दी जमणार नाही, यासाठी संबंधित राज्यांनी कडक निर्बंध लादण्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले होते. पण तरीही काही राज्यांमध्ये निवडणुकांचे कल समोर येत असताना आघाडीवर असलेल्या उमेदवारांच्या पक्ष कार्यकर्त्यांनी जल्लोष करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे अशा लोकांवर कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश निवडणूक आयोगाकडून सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना देण्यात आले आहेत.

अधिका-यांचे निलंबन करण्याचे आदेश

या नियमांच्या उल्लंघनाकडे केंद्रीय निवडणूक आयोग अतिशय गांभीर्याने बघत असल्याचे, निवडणूक आयोगाने म्हटले आहे. नियमांचा भंग होत असणा-या संबंधित क्षेत्रातील पोलिस अधिका-यांना निलंबित करुन, त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाकडून देण्यात आले आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here