Election Commission ने काँग्रेसचे सर्व दावे फेटाळले; वाचा काय दिले उत्तर?

84
महाराष्ट्राच्या मतदार यादीत कसलाही घोळ नाही; Election Commission चे कॉंग्रेसला 60 पानांचे उत्तर

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीबाबत केंद्रीय निवडणुक आयोगाकडून (Election Commission) महत्वाची माहिती देण्यात आली आहे. निवडणुक आयोगाने काँग्रेसने (Congress) तक्रारींमध्ये केलेले सर्व दावे आयोगाने फेटाळून लावत याबाबतची कारणेही दिली आहेत. मतदारांची नावे गायब होणे, मतदानादिवशी शेवटच्या तासाभरात वाढलेले मतदान, ईव्हीएम आदी मुद्यांवर काँग्रेसकडून अपेक्षा घेण्यात आले होते.

( हेही वाचा : Bihar Assembly Election : एनडीए बिहार निवडणूक नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली लढवेल मात्र…

काँग्रेसने (Congress) केलेल्या सर्व दाव्यांवर आयोगाने दि. २४ डिसेंबर रोजी काँग्रेसला सविस्तर उत्तर पाठवले आहे. महाराष्ट्रातील ५० विधानसभा मतदारसंघात (Assembly constituency) जुलै ते नोव्हेंबर या कालावधीत ५० हजार मतदार वाढल्याची तक्रार काँग्रेसने (Congress) केली होती. हा दावा फेटाळण्यात आला आहे. जुलै ते नोव्हेंबर या काळात ५० हजार मतदार वाढले आहेत. पण हे केवळ सहा मतदारसंघांशी संबंधित असल्याचे आयोगाने म्हटले आहे. (Election Commission)

मतदानाच्या टक्केवारीवरही आयोगाने उत्तर दिले आहे. अचानक मतदान वाढल्याचे दाखवले जात असल्याचा आरोप काँग्रेसने (Congress) केला होता. त्यावर आयोगाने केलेल्या खुलाशामध्ये म्हटले आहे की, मतदानाच्या टक्केवारीत बदल करणे, अशक्य आहे. कारण उमेदवारांच्या एजंटजवळ फॉर्म १७ सी असतो. त्यामध्ये मतदान संपल्यानंतर मतदानाची टक्केवारी नमूद केली जाते. ते आकडे पडताळून पाहू शकता, असे आयोगाने स्पष्टपणे सांगितले आहे. (Election Commission)

दरम्यान, सायंकाळी पाच वाजताच्या आकडेवारीची तुलना अंतिम आकडेवारीशी करणे योग्य नाही, असे निवडणूक आयोगाने कॉग्रेसला दिलेल्या उत्तरात म्हटले आहे. सायंकाळी 5 ते 11.45 या वेळेत मतदानात वाढ होणे एक सामान्य बाब आहे. कारण मतदानाच्या एकत्रीकरणाची प्रक्रिया सुरू असते. वास्तविक मतदान आणि मतांची मोजणी यात किंचितसा फरक आढळून येवू शकतो, असेही आयोगाने म्हटले आहे.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.