Election Commission : निवडणूक आयोगाकडून ‘ईव्हीएम’बाबत मोठा खुलासा

310
Election Commission : निवडणूक आयोगाकडून 'ईव्हीएम'बाबत मोठा खुलासा
Election Commission : निवडणूक आयोगाकडून 'ईव्हीएम'बाबत मोठा खुलासा

महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीच्या तारीखांची दि. १५ ऑक्टोबर रोजी निवडणुक आयोगाकडून घोषणा करण्यात आली. त्याआधी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार (Rajeev Kumar) यांनी ईव्हीएमबाबत मोठे विधान केले आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी विरोधाकांनी ईव्हीएमबाबत केलेले विधान फेटाळत ईव्हीएम १०० टक्के सुरक्षित असल्याचे सांगितले. (Election Commission)

( हेही वाचा : “मंदिर हे एक सार्वजनिक ठिकाण, खासगी मालमत्ता नाही”; Rajasthan High Court ने ट्रस्टला फटकारलं!

काँग्रेस नेते रशीद अल्वी यांनी दावा केला होता की, इस्त्रालयने दहशतवादी संघटना हिजबुल्लाहचे पेजर हॅक केल्याचे उदाहरण देऊन ईव्हीएममध्ये फेरफार केला जाऊ शकतो. तर काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी निवडणूक आयोगाला एका पत्राद्वारे निवेदन केले. त्यात जयराम रमेश म्हणाले की, हरियाणातील २० विधानसभा मतदारसंघात निवडणूक प्रक्रियेत गंभीर आणि स्पष्ट अनियमितता अधोरेखित होते, असेही ते म्हणाले. (Election Commission)

हे सर्व आरोप निवडणूक आयोगाने फेटाळले असून ईव्हीएम १०० टक्के सुरक्षित असल्याचे सांगितले आहे. एएनआयशी बोलताना मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार (Rajeev Kumar) म्हणाले की, मतदानात सहभागी होऊन लोक प्रश्नांची उत्तरे देतात. ईव्हीएमबाबत प्रश्न असेल तर ते १०० टक्के सुरक्षित आहे. जर विरोधकांनी पुन्हा प्रश्न उपस्थित केले तर आम्ही त्यांना पुन्हा उत्तर देऊ, असेही ते म्हणाले. (Election Commission)

हेही पाहा :

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.