शिवसेना उबाठा (UBT)गटातर्फे मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांना दि. ३१ ऑक्टोबर एक पत्र लिहून छत्रपती शिवाजी महाराज उद्यान दादर येथील दीपोत्सवाची तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर दि. १ नोव्हेंबरला निवडणूक आयोगाने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) (UBT) पक्षाला ह्या सर्व प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आल्याचे पत्र पाठविले. त्यातच दि. १ नोव्हेंबर रोजी निवडणुक आयोगाने मुंबई महापालिकेला छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातील दीपोत्सवातील मनसेचे कंदील हटवण्याचे निर्देश दिले. त्यानुसार रात्री १ वाजण्याच्या सुमारा पालिका कर्मचाऱ्यांनी मनसेचे हे कंदील हटवले आहेत. (MNS)
(हेही वाचा : Diwali 2024 : दिवाळी पाडवा सणाचे महत्त्व आणि शास्त्र)
दरम्यान उबाठा गटाने केलेल्या तक्रारीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेद्वारे (MNS) आयोजित दीपोत्सवामुळे आचारसंहितेचा भंग होत असल्याची सांगण्यात आले होते. तसेच या दीपोत्सवाचा संपूर्ण खर्च येथील स्थानिक माहीम विधानसभेचे मनसे उमेदवार अमित ठाकरेंच्या निवडणुक खर्चात समाविष्ट करण्याची मागणी उबाठा गटाने केली होती. त्याबाबत कोणतीही कारवाई झाल्याची माहिती समोर आलेली नाही. मात्र यामुळे अमित ठाकरे यांची उमेदवारी धोक्यात आल्याचे बोलले जात आहे. (MNS)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community