Election symbol : अपक्ष, मान्यता नसलेल्या राजकीय पक्षांसाठी 193 मुक्त निवडणूक चिन्ह

निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या यादीमध्ये शिटी, सुई, लोकर, खिडकी, पाकीट, ट्रम्पेट अशा अनेक चिन्हांचा समावेश आहे.

159

निवडणूक आयोगाने 193 निवडणूक चिन्हांची यादी जाहीर केली आहे. यामुळे मान्यता नसलेल्या राजकीय पक्षांसाठी या चिन्हांपैकी कोणतेही एक चिन्ह निवडणे सोपे होणार आहे. तसेच अपक्ष म्हणून निवडणूक लढणाऱ्याना देखील या चिन्हाचा लाभ घेता येणार आहे, हे विशेष.

राखून ठेवलेल्या या चिन्हामध्ये काठी, बेबी वॉकर, एअर कंडीशनर, फुगा, बांगड्या, कंदील अशा अनेक चिन्हांचा समावेश आहे. राज्य व राष्ट्रीय स्तरावरील पक्ष त्यांना मिळालेल्या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवितात. मात्र अपक्ष तसेच मान्यता नसलेल्या राजकीय पक्षासाठी या चिन्हांपैकी कोणतेही एक चिन्ह निवडून निवडणूक लढविणे सोपे होणार आहे. निवडणूक आयोगाने वेळोवेळी प्रसिद्ध केलेल्या चिन्हांच्या यादीतूनच चिन्ह निवडावे लागते. निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या यादीमध्ये शिटी, सुई, लोकर, खिडकी, पाकीट, ट्रम्पेट अशा अनेक चिन्हांचा समावेश आहे. याचा उपयोग पुढे होणाऱ्या अनेक निवडणूकमध्ये होईल.

(हेही वाचा Road Accident : १० वर्षांत राज्यामधील रस्ते अपघातातील मृतांची संख्या थक्क करणारी)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.