Election Commission चे पथक 27 रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर

47
Election Commission चे पथक 27 रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर
Election Commission चे पथक 27 रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर

केंद्रीय निवडणूक आयोगाचे पथक आगामी 27 आणि 28 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्याबाबत एक पत्रच मुख्य निवडणूक आयोगाने राज्य मुख्य निवडणूक अधिकाऱ्याला पाठवले आहे. विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी आयोगाचे (Election Commission) पथक राज्याच्या दौऱ्यावर येत असल्याचे राजकीय वर्तुळात चर्चेला सुरुवात झालीय. राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी आता निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.

(हेही वाचा – Assembly Election : राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या निशाण्यावरती नितेश राणेच का ?)

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे (Maharashtra Assembly Election 2024) पडघम वाजण्यास सुरुवात झाली असून सगळे राजकीय पक्ष त्या दृष्टीने तयारीला देखील लागले आहेत. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात निवडणूक होण्याची शक्यता असल्याचे महायुतीमधील ज्येष्ठ नेत्याने शुक्रवारी सांगितले होते. परंतु, निवडणुकीची नेमकी तारीख काय असेल याबाबत उत्कंठा आहे. यापार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या टीमच्या महाराष्ट्र दौऱ्याकडे सर्वाचे डोळे लागले आहेत. या दोन दिवसीय दौऱ्यात केंद्रीय निवडणूक आयोग राज्यातील प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहे. या बैठकीनंतर विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होऊ शकतात, असा अंदाज आहे. आपल्या या दोन दिवसीय दौऱ्यात निवडणूक आयोगाचे पथक पहिल्या दिवशी म्हणजेच 27 तारखेला राजकीय पक्ष, निवडणूक अधिकारी, निवडणुका राबवणाऱ्या यंत्रणा तसेच पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेणार आहे. तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 28 सप्टेंबरला दुपारी 4.30 वाजता निवडणूक आयोगाची (Election Commission) पत्रकार परिषद होण्याची शक्यता आहे.

देशातील जम्मू-काश्मीर, हरियाणासोबतच महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक होईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. परंतु, निवडणूक आयोगाने इतर राज्यांच्या निवडणुका जाहीर करताना त्यातून महाराष्ट्राला वगळले. त्यामुळे राज्यात नेमकी निवडणूक कधी..? याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. महाराष्ट्राच्या वर्तमान विधानसभेचा कार्यकाळ आगामी 26 नोव्हेंबर 2024 रोजी संपुष्टात येणार आहे. त्यामुळे राज्यात नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात निवडणूक होण्याची शक्यता आहे. वेळेत निवडणूका घेणे, ही घटनात्मक सक्ती आहे. कारण वेळेत निवडणूक न झाल्यास राज्यात राष्ट्रपती शासन लावावे लागेल. अशी परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून 10 ते 20 नोव्हेंबर दरम्यान निवडणूक होईल असे निवडणूक आयोगातील (Election Commission) सूत्रांनी स्पष्ट केले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.