राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा यावर शुक्रवार, ६ ऑक्टोबर रोजी केंद्रीय निवडणूक आयोगासमोर (Election Commission) सुनावणी सुरु झाली. त्यावर आधी अजित पवार (Ajit Pawar) गटाकडून युक्तीवाद करण्यात आला. त्यावेळी वकील मनिंदर सिंह यांनी अजित पवार गटाकडून युक्तीवाद करताना आमदारांची संख्या महत्वाची आहे, त्याआधारे पक्ष कुणाचा हे ठरवता येईल, असा वकील मनिंदर सिंह म्हणाले.
शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासोबत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड, खासदार वंदना चव्हाण हे निवडणूक आयोगात दाखल झाले. शरद पवार आजच्या सुनावणीसाठी निवडणूक आयोगाच्या (Election Commission) कार्यालयात दाखल झाले. त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. दोन्ही गटांनी आपापल्या दाव्यांचे दस्तावेज निवडणूक आयोगापुढे सादर केले.
काय म्हणाले वकील मनिंदर सिंह?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय दर्जा गेला आहे. त्यामुळे आमदारांची संख्याच आता महत्त्वाची आहे. पक्षाच्या घटनेचे पालन व्यवस्थित होत नाही. केवळ एका पत्राद्वारे पक्षात नियुक्त्या होत नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील यांची जी नियुक्ती करण्यात आलेली नाही, ती नियुक्तीच बेकायदेशीर आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांची निवड होण्याआधीच जयंत पाटील यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती कशी होऊ शकते, असा सवाल वकील जेठमलानी यांनी केला.