भारतीय निवडणूक आयोग (Election Commission) सोमवार म्हणजेच ९ ऑक्टोबर रोजी तेलंगणा, छत्तीसगड, राजस्थान, मध्य प्रदेश आणि मिझोराम या पाच राज्यांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर करणार आहे. यासंदर्भातली पत्रकार परिषद आज दुपारी १२ वाजता सुरू होईल.
40 सदस्यांच्या मिझोराम विधानसभेचा (Election Commission) कार्यकाळ डिसेंबरमध्ये संपणार आहे, तर 90 सदस्यांच्या छत्तीसगड विधानसभेचा आणि आणखी तीन राज्यांचा कार्यकाळ जानेवारीत संपणार आहे.
मध्य प्रदेश (230 सदस्य), राजस्थान (200 सदस्य) आणि तेलंगणा (119 सदस्य) विधानसभा निवडणुकाही येत्या आठवड्यात होणार आहेत.
भारतीय निवडणूक आयोग सोमवार ९ ऑक्टोबर रोजी तेलंगणा, छत्तीसगड, राजस्थान, मध्य प्रदेश आणि मिझोराम या पाच राज्यांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर करणार आहे. यासंदर्भातली पत्रकार परिषद आज दुपारी १२ वाजता सुरू होईल.#electioncommissionofindia #pressconference #electiondates #fivestates pic.twitter.com/Gui3OLmPSp
— Hindusthan Post Marathi (@HindusthanPostM) October 9, 2023
(हेही वाचा – Virat Kohli : वर्ल्ड कपमध्ये विराटच ‘किंग’; सचिनलाही मागे टाकत रचला ‘हा’ विक्रम)
तयारीवर देखरेख ठेवण्यासाठी निवडणूक आयोग गेल्या दोन महिन्यांपासून निवडणूक होणाऱ्या पाच राज्यांना भेट देत आहे.
नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून (Election Commission) डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कधीही मतदान होण्याची शक्यता आहे, असे सूत्रांनी सांगितले आहे. त्यांनी पुढे सांगितले की; राजस्थान, मध्य प्रदेश, मिझोराम आणि तेलंगणामध्ये 2018 प्रमाणेच एकाच टप्प्यात मतदान होईल.
निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, छत्तीसगडमध्ये दोन टप्प्यात मतदान होण्याची शक्यता आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community