‘राष्ट्रवादी काँग्रेसवर ताबा कुणाचा?’ या मुद्द्यावरून सुरु असलेल्या संघर्षावर केंद्रीय निवडणूक आयोगात सोमवारी (२०नोव्हेंबर)नियमित सुनावणी होणार आहे. शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही गटांनी पक्ष आणि घड्याळ या निवडणूक चिन्हावर दावा सांगितला असल्याने आयोग कोणाच्या बाजूने कौल देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यासाठी शरद पवार आणि सुप्रिया सुळे दिल्लीला जाणार आहेत. तसेच दिल्लीत शरद पवार गटाची बैठक होण्याची शक्यता आहे. (NCP Crisis)
यापूर्वीच्या सुनावणीत काय झाले
निवडणूक आयोगापुढे २ नोव्हेंबर रोजी सुनावणी झाली. त्यात अभिषेक मनु सिंघवी यांनी दोन तास युक्तिवाद केला. त्यात त्यांनी अजित पवार गटावर अनेक गंभीर आरोप केले. अजित पवार गटाकडून खोटी प्रतिज्ञापत्र दाखल केली असल्याचा आरोप त्यांनी युक्तीवाद करताना केला. मृत्यू झालेल्या लोकांची प्रतिज्ञापत्रे दिली गेली आहे. तसेच अल्पवयीन मुलांची प्रतिज्ञापत्रे दाखल केल्याचा दावा सिंघवी यांनी केला. अजित पवार यांच्याकडे काहीच समर्थन नसल्याचे त्यांनी युक्तीवाद करताना म्हटले.खोटी माहिती दिल्याबद्दल भारतीय दंड संहितेतील कलम संबंधितांविरोधात लावली जावीत, अशी मागणीही सिंघवी यांनी केली होती.
(हेही वाचा : LCA MARK 2 : लढाऊ विमाननिर्मितीत भारताचे मोठे पाऊल; अमेरिकेसोबत करणार ‘ही’ निर्मिती)
अजित पवार गटाने केली ही मागणी
दरम्यान, अजित पवार गटाकडून सलग सुनावणी व्हावी, अशी मागणी करण्यात आली. त्यामुळे २० नोव्हेंबरपासून सलग सुनावणी सुरु होण्याची शक्यता आहे. सुनावणीत काही तांत्रिक गोष्टी आम्ही आयोगासमोर आणणार आहोत, असे खासदार सुनील तटकरे यांनी म्हटले होते. त्यामुळे नवी दिल्लीत होणाऱ्या सुनावणीकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community