मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार (Election Commissioner of India Rajeev Kumar) यांनी दि. २८ सप्टेंबर रोजी पत्रकार परिषद घेत, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूकीसंदर्भात माहिती दिली आहे. दोन दिवसापासून कुमार महाराष्ट्र दौऱ्यावर असून त्यांनी ११ राजकीय पक्षांशी वेगवेगळ्या मुद्यांवर चर्चा केली. त्यामध्ये सणवाराच्या दिवसांचा विचार करून निवडणूक प्रक्रिया राबवण्याची अपेक्षा राजकीय पक्षांनी मुख्य निवडणूक आयुक्तांकडे केली आहे.
( हेही वाचा : भाजपा मित्रपक्षांना सन्मानाचीच वागणूक देतो; Sunil Tatkare यांचा दावा)
मुख्य निवडणूक आयुक्तांनी (Election Commissioner of India) दिलेल्या माहितीनुसार, ‘आमचं महाराष्ट्र आमचं मतदान’ ही विधानसभा निवडणूकीची टॅगलाईन असेल. तर महाराष्ट्रात ९ कोटी ५९ लाख मतदार आहे. त्यातील १२ लाख ४८ मतदार हे ८५ वर्षावरील आहेत. तसेच राज्यात १० लाख ७७ हजार महिला मतदार आणि १९ लाख ४८ हजार नवमतदार आहेत. जे यंदाच्या विधानसभा निवडणूकीत (Assembly Elections) पहिल्यांदाच मतदान करणार आहेत. विशेष म्हणजे, १०० वर्षांवरील ४९ हजार मतदार आहेत. तर दिव्यांग मतदारांची संख्या राज्यात ६.३ लाख इतकी आहे.
दरम्यान ही संपूर्ण मतदान प्रक्रिया राबवण्यासाठी राज्यात १ लाख ८६ हजार मतदान केंद्र असतील. त्यातील ३५० मतदान केंद्रावर नवतरुण अधिकारी काम पाहणार आहेत. तसेच काही मतदान केंद्र (polling booth) महिलांकडून नियंत्रित केली जाणार आहेत. त्यासोबतच दारू, पैसा किंवा अन्य मार्गाने होणार गैरवापर रोखण्यासाठी ३०० चेक नाक्यांची करडी नजर ठेवण्यात येणार आहे. त्याच्याबरोबर देशातील एकूण मतदानाच्या टक्केवारीनुसार सर्वाधिक कमी होणाऱ्या विभागात महाराष्ट्रातील मुंबादेवी, कुर्ला, कुलाबा, कल्याण, पुणे छावणी या विभागाचा समावेश आहे. तसेच मुख्य निवडणूक अधिकारी राजीव कुमार यांनी घेतलेल्या आढावा बैठकीनंतर त्यांच्या असे लक्षात आले की, दिवाळीनंतर विधानसभा निवडणूकीचं (Assembly Elections) बिगूल वाजण्याची शक्यता अधिक आहे. कारण राजकीय पक्षांनी देखील सणवारांच्या दिवसांमध्ये निवडणूक घेण्यासंदर्भात विचार करावे, असे कुमार यांना सांगितले आहे. तरी विधानसभा निवडणूक (Assembly Elections) कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही पाहा :