Election Commission : आता मतदानांच्या दिवशी असंघटीत कामगारांना मिळणार भरपगारी रजा

राज्यात ९ कोटी ५९ लाख मतदार

149
Election Commission : आता मतदानांच्या दिवशी असंघटीत कामगारांना मिळणार भरपगारी रजा
Election Commission : आता मतदानांच्या दिवशी असंघटीत कामगारांना मिळणार भरपगारी रजा

यंदा महाराष्ट्र ९ कोटी ५९ लाख मतदार मतदानाचा अधिकार बजावणार आहेत. यामध्ये १९ लाख ४८ हजार नवमतदार आहेत. त्यामुळे मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाकडून (Election Commission) अथक परिश्रम घेतले जात आहेत. मात्र रोजंदारीवर काम करणाऱ्या असंघटीत कामगारांना मतदानाच्या दिवाशी कामावर रजा घेऊन मतदानाला जाणे अवघड होते. कारण रोजंदारीवर काम करत असल्यामुळे पोटाला चिमटा बसू शकतो. त्यामुळे असंघटीत कामगारांना भरपगारी रजा (Paid Leave) मतदानाच्या दिवशी मिळावी, यासाठी निवडणूक आयोग विशेष लक्ष घालणार आहे. यासंदर्भातील माहिती मुख्य निवडणूक अधिकारी राजीव कुमार (Election Commissioner of India Rajiv Kumar) यांनी पत्रकार परिषदेत दिली.

( हेही वाचा : एकाच घरात भाजपा किती जणांना उमेदवारी देणार?; Nilesh Rane यांच्या उमेदवारीवरून महायुतीत अडचणी

असंघटीत कामगाराचा मतदानाकडे न वळण्याचे मोठे कारण आर्थिक समस्या हे असते. त्यामुळे सर्व जिल्ह्याच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांशी झालेल्या बैठकीत या मुद्द्यावर तोगडा काढण्यासाठी चर्चा केली. तेव्हा असंघटीत कामगारांना भरपगारी रजा औद्योगिक क्षेत्रातील कामगारांना मिळाल्यास ते मतदानाकडे वळू शकतील. त्यामुळे असंघटीत कामगारांना भरपगारी रजा (Paid Leave) देण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी राजीव कुमार (Election Commissioner of India Rajiv Kumar) यांनी दिली. तसेच मतदान यादींमधून मतदारांची नावे गायब होण्याच्या मुद्याबद्दल कुमार म्हणाले की, ऑक्टोबरमध्ये मतदारांची प्रारुप यादी सर्वप्रथम जाहीर केली जाते. ही यादी सर्व पक्षांना ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही मार्गाने निवडणूक आयोगाकडून (Election Commission) पुरवली जाते.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.