काँग्रेसमध्ये गेल्या काही काळापासून सातत्याने अंतर्गत नाराजी असल्याचे बोलले जात असून अनेक दिग्गज नेत्यांनी काँग्रेसला टाटा-बाय बाय केले आहे. त्यामुळे काँग्रेसच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे होत आहे. त्यामुळे याची गंभीर दखल पक्षाकडून घेण्यात आली असून काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक 17 ऑक्टोबर रोजी घेण्यात येणार आहे. त्यामुळे लवकरच काँग्रेसला नवा अध्यक्ष मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
17 ऑक्टोबरला होणार निवडणूक
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी काँग्रेसच्या नेतृत्वावर टीका करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये लवकरच नेतृत्व बदल होणा असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे 17 ऑक्टोबर रोजी अध्यक्षपदाची निवडणूक होणार असून 19 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. काँग्रेसच्या वर्किंग कमिटीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या निवडणुकीसाठी 24 सप्टेंबरपासून नामांकन अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. या निवडणुकीला उभं राहण्यास राहुल गांधी यांनी नका दिल्याचे सांगण्यात येत आहे.
कार्यक्रम ठरला
काँग्रेस कमिटीच्या या बैठकीला सोनिया गांधी,राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हे देखील उपस्थित होते. या निवडणुकीसाठी केवळ एकच व्यक्ती उभा राहणार असेल तर निवडणुकीचा निकाल अर्ज मागे घेण्याच्या दिवशीच घेण्यात येईल, असे काँग्रेस नेते मधुसूदन मिस्त्री यांनी सांगितले. तसेच या बैठकीत निवडणुकीचा कार्यक्रम देखील ठरवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
Join Our WhatsApp Community