महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष (State legislative assembly) पदाची निवडणूक २६ मार्च २०२५ या दिवशी होणार असून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे यांची बिनविरोध निवड होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
मंगळवारी सकाळी उमेदवारी अर्ज भरणार
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सोमवारी २४ मार्च २०२५ या दिवशी विधानसभा उपाध्यक्ष पदाची निवडणूक (State legislative assembly) जाहीर केली. या पदासाठी उमेदवारी भरण्याची मुदत मंगळवारी २५ मार्च असून बुधावरी २६ मार्च सकाळी ११ पर्यंत उमेदवारी मागे घेण्याची मुदत आहे.
(हेही वाचा Malegaon Blast प्रकरणात कर्नल प्रसाद पुरोहितांना सैन्य अधिकाऱ्यांनी गोवले; abinewz.com चा धक्कादायक खुलासा)
अण्णा बिनविरोध
विरोधी महाविकास आघाडीतील तीनही पक्षांचे मिळून विरोधी पक्ष नेता निवडीइतके संख्याबळ नसताना विरोधी पक्ष हा उपाध्यक्ष पदाची निवडणूक (State legislative assembly) लढणार नाही, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यामुळे बुधवारी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे पिंपरी-चिंचवडचे आमदार अण्णा बनसोडे यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा होऊ शकते, अशी शक्यता आहे.
Join Our WhatsApp Community