पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कोल्हापुरात सभेसाठी आले असून येथील व्यासपीठावरुन उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीसांनी भाषण करताना थेट गादीचा उल्लेख करत भाषणाला सुरुवात केली. मान देऊ गादीला, मत देऊ मोदीला असे म्हणत महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी केले.
एअर स्ट्राईक करुन पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर
कोल्हापुरातील ही लढाई मंडलिक विरुद्ध शाहू महाराज नाही किंवा धैर्यशील माने विरुद्ध शेट्टी अशी नाही. तर, ही निवडणूक नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी निवडणूक आहे. आपण श्रीरामांना मानतो, मग प्रभू श्रीरामांच्या हातात धनुष्यबाण आहे. श्रीरामांच्या हातातील तोच बाण संजय मंडलिक आणि मानेंच्या हातात आहे. त्यामुळे, मोदींच्या हातातही धनुष्यबाण आहे. कोल्हापुरात महायुतीच्या काळात टोलमाफी दिली, पण महाविकास आघाडीने पुन्हा टोल सुरू केला. कोल्हापूर हा भगव्याच्या मागे उभा राहणारा जिल्हा, देशभक्तांच्या मागे उभे राहणारा जिल्हा आहे. देशाला मोदींच्या रुपाने असा नेता मिळाला आहे, ज्यांना देशाला सुरक्षित केले. देशाला स्वाभीमान दिला, देशाला विकसित केले. यापूर्वी आपले पंतप्रधान अमेरिकेकडून विणवण्या करायचे, पण मोदींजी सर्जिकल स्ट्राईक केला, एअर स्ट्राईक करुन पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले, अशी उपमुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadanvis) म्हणाले.
(हेही वाचा Lok Sabha Election 2024 : माधवी लता यांची मुस्लिम महिलांमध्ये लोकप्रिय वाढली)
आपण जिवंत आहोत ते मोदींमुळेच
आपल्याला माहिती आहे, हा देश आता अग्नि मिसाईलवाला झाला आहे. मोदींनी नवभारताची नवनिर्मिती केली. कोविडच्या त्या काळात नातेवाईक देखील ओळख दाखवत नव्हते. जगातील लोक म्हणायचे भारतातील 40 ते 50 कोटी लोक मेल्याशिवाय राहणार नाहीत. संपूर्ण जग चिंतेत होते, पण भारतात एक वाघ पंतप्रधान होते. या वाघाने आपल्या शास्त्रज्ञांना सांगून कोविडची लस भारतात तयार केली. त्यामुळे, भारतातील लोक जिवंत आहेत. त्यामुळे, मी म्हणेन, आज आपण जिवंत आहोत ते मोदींमुळेच, जान है तो जहान है… म्हणून मोदींना आज मत द्यायचे आहे. संजय मंडलिक आणि माने यांना मतदान करुन मोदींना मत द्यायचे आहे, असे म्हणत देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadanvis) कोल्हापुरातील जनेतेला आवाहन केले.
Join Our WhatsApp Community