लोकसभेतील शिवसेना संसदीय पक्षाच्या उपनेतेपदी खासदार धैर्यशील माने (Dhairyashil mane) यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. धैर्यशील माने हे महाराष्ट्रातील हातकणंगले मतदार संघातून सलग दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आले आहेत. माने यांच्या निवडीचे पत्र शिवसेना पक्षाचे प्रमुख नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी लोकसभा अध्यक्षांकडे सादर केले.
(हेही वाचा- हल्ल्यामागचे मुख्य मास्टरमाईंड Raj Thackeray; Amol Mitkari यांचे आरोप…मनसैनिकाच्या मृत्यूने तापले राजकारण)
शिवसेना पक्षाने लोकसभेची जबाबदारी युवा खासदारांवर सोपवलेली आहे. नुकताच कल्याणचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे (Dr. Shrikant Shinde) यांची शिवसेना पक्षाच्या लोकसभेतील गटनेतेपदी निवड करण्यात आली होती. आता शिवसेना संसदीय पक्षाच्या उपनेतेपदी खासदार धैर्यशील माने (Dhairyashil mane) यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. तरुण आणि अभ्यासू खासदार म्हणून धैर्यशील माने यांची ओळख आहे. नुकताच धैर्यशील माने (Dhairyashil mane) यांनी अर्थसंकल्पावरील भाषणात विरोधकांचा कठोर शब्दांत समाचार घेतला होता.
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून शिवसेनेचे ७ खासदार निवडून आले असून शिवसेनेने केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारला पाठिंबा दिला आहे. (Dhairyashil mane)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community