- खास प्रतिनिधी
पाच महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान अनेक मतदारांनी त्यांचा मोबाईल फोन मतदान केंद्राच्या शंभर मीटर अंतरावर ठेवण्याच्या पोलिसांच्या सुचनेमुळे मतदान करणे टाळले आणि केंद्रावरून माघारी फिरणे पसंत केले. नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मात्र किमान १०० मीटर आत पण केंद्रापर्यंत मोबाईल नेण्याची परवानगी मिळू शकते. (Polling)
(हेही वाचा – Assembly Election : राज्यातील पोलिसांच्या रजा रद्द)
निर्बंधाच्या सुचनेचा फेरविचार
राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांनी बुधवारी १६ ऑक्टोबर २०२४ ला पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की, केंद्रीय निवडणूक आयोगाने यासंदर्भात मते मागितली होती. त्यानुसार राज्य निवडणूक कार्यालयाने १०० मीटरपर्यंत मोबाइल निर्बंधाच्या सुचनेचा फेरविचार करावा, अशी शिफारस केल्याचे चोकलिंगम यांनी स्पष्ट केले. (Polling)
(हेही वाचा – बेस्टमध्ये खासगी बसेसची सेवा घेण्याचा आमचा प्रयत्न फसला; UBT Shiv Sena च्या सुहास सामंतांनी केले मान्य)
मोबाईल गरजेची बाब
निवडणूक अधिकारी पुढे म्हणाले, सद्यस्थितीत सगळेच मोबाईल घेऊन बाहेर पडतात आणि ही गरजेची बाब झाली आहे. प्रत्येकाला काही कामानिमित्त संपर्क करणे आवश्यक असते. त्यामुळे केंद्राच्या आत नाही पण तिथपर्यंत मोबाईल नेण्यासाठी परवानगी द्यावी, अशी शिफारस राज्याने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे. (Polling)
(हेही वाचा – Vote Jihad शब्दाने आचारसंहितेचा भंग होतो का? निवडणूक अधिकारी म्हणाले, पुरावे तपासावे लागतील… )
सकारात्मक निर्णयाची अपेक्षा
लोकसभा निवडणुकीनंतर १०० मीटरबाहेर मोबाइल ठेवण्याच्या निर्णयावर मतदारांकडून प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात येत होती. अनेकांनी तर या विचित्र नियमांमुळे मतदान करणे टाळले. त्यामुळे आता या प्रश्नाची दखल घेऊन नागरिकांना दिलासा देण्याच्या उद्देशाने राज्य निवडणूक कार्यालयाने केंद्रीय आयोगाला शिफारस केली आहे. त्यावर केंद्रीय आयोग सकारात्मक निर्णय घेईल ही अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. (Polling)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community