मविआचा पाठिंबा असलेल्या शुभांगी पाटील वादाच्या भोवऱ्यात? थेट मतदान केंद्रावरच करत होत्या प्रचार

117

नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी सोमवारी, सकाळी ८ वाजल्यापासून मतदानास प्रारंभ झाला. माहितीनुसार, पहिल्या दोन तासात या विभागात ६.५२ टक्के मतदान झाले, तर दुपारी १२ वाजेपर्यंत १७.२० टक्के मतदान झाले. या मतदान प्रक्रियेदरम्यान महाविकास आघाडीच्या पाठिंबा असलेल्या अपक्ष नेत्या शुभांगी पाटील संगमनेर शहरातील मतदान केंद्रावर जाऊन मतदारांच्या भेटी घेत होत्या. त्यामुळे याला आक्षेप घेत संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांना रोखले. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून शुभांगी पाटील वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे.

नक्की काय घडले?

अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथील मतदान केंद्रावर मतदार रांगेत उभे होते. त्यावेळी शुभांगी पाटील हात जोडून प्रत्येक मतदारसमोर जात होत्या. हे पाहून समोरील उमेदवाऱ्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रचार करत असल्याचा आक्षेप घेतला. त्यामुळे मतदार केंद्रावरील निवडणुकीच्या कामासाठी तैनात असलेल्या अधिकाऱ्यांनी नियमांचे उल्लंघन होत असल्याच्या कारणास्तव शुभांगी पाटलांना हटकले. आणि त्यांना परिसरातून बाहेर जाण्याच्या सूचना केल्या. यादरम्यान अधिकारी आणि पाटील यांच्या संवाद झाला. त्यावेळी अधिकाऱ्यांनी शुभांगी पाटील यांना नियमांचा उल्लंघन करत असल्याचे सांगून. ही ग्रामपंचायत स्तरावरील निवडणूक नसल्याचे सांगितले. दरम्यान नाशिक पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचा पाठिंबा घेऊन रणसंग्रामात उतरलेल्या अपक्ष शुभांगी पाटील आणि आमदार सुधीर तांबे यांचे सुपुत्र काँग्रेसचे बंडखोर, अपक्ष सत्यजित तांबे यांच्यात मुख्य लढत आहे.

(हेही वाचा – चंद्रकांत खैरेंच्या मुलाने बदलीसाठी घेतले पैसे: ऑडिओ क्लिप झाली व्हायरल)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.