Election Result 2022: गुजरातमध्ये भाजपची मजबूत स्थिती; हिमाचलसह इतर निवडणुकांची स्थिती घ्या जाणून

122

देशातील राजकीय पक्षांसाठी गुरुवार (आजचा) दिवस खूप खास आहे, कारण गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकांचे निकाल येणार आहेत. यासोबतच उत्तर प्रदेशातील मैनपुरी लोकसभा जागेसह बिहार, छत्तीसगड, ओडिशा, राजस्थान आणि उत्तर प्रदेश या 5 राज्यांतील विधानसभा जागांवर झालेल्या पोटनिवडणुकीचे निकालही गुरुवारी येणार आहेत. यामध्ये गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभेच्या निकालाबाबत लोकांमध्ये उत्सुकता असतानाच उत्तर प्रदेशच्या मैनपुरी लोकसभा मतदारसंघाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निवडणूक निकालांदरम्यान देशातील पक्षांमध्ये उत्साह आणि अस्वस्थता दोन्ही पाहायला मिळत आहे. जिथे ज्या पक्षाचे सरकार स्थापन होताना दिसत आहे, त्या पक्षाच्या कार्यालयात उत्साह दिसून येत आहे.

हीच स्थिती गुजरातमध्ये 

गुजरात विधानसभा निवडणुकीबद्दल बोलायचे झाले तर  भाजपने येथे आघाडी घेतली आहे. आतापर्यंतच्या निकालानुसार भाजप विक्रमी जागांवर आघाडीवर आहे. आतापर्यंत भाजप 156 जागांवर आघाडीवर आहे. त्याचवेळी जामनगर उत्तरेकडून क्रिकेटर रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा आघाडीवर आहे. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल घाटलोडियामध्ये 23 हजार 713 मतांनी आघाडीवर आहेत. दुसरीकडे काँग्रेसबद्दल बोलायचे झाले तर त्यांची कामगिरी मागच्यापेक्षा खराब आहे, तर आप नऊ जागांसह आघाडीवर आहे.

( हेही वाचा: Gujarat Election 2022: भाजप 100 हून अधिक जागांवर आघाडीवर )

हिमाचलमध्ये भाजप-काँग्रेसमध्ये लढत

हिमाचल प्रदेशात काॅंग्रेस आघाडीवर आहे. भाजप आणि काँग्रेसमध्ये जोरदार लढत आहे. आतापर्यंतच्या कलानुसार भाजप 27 जागांवर तर काँग्रेस 38 जागांवर आघाडीवर आहे. याशिवाय याठिकाणी आम आदमी पक्षाचे खाते अद्याप उघडलेले नाही. हिमाचलमध्ये गुरुवारी 412 उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे.

उत्तर प्रदेशची स्थिती

उत्तर प्रदेशच्या मैनपुरी लोकसभा जागेबद्दल बोलायचे झाले तर, येथील सर्व विधानसभा मतदारसंघांच्या मतमोजणीच्या पहिल्या फेरीनंतर डिंपल यादव विजयाकडे वाटचाल करताना दिसत आहेत. डिंपल यादव आतापर्यंत एकूण 50 हजार मतांनी आघाडीवर आहेत. दुसरीकडे, रामपूरमध्ये सपा उमेदवार अमिस रझा आघाडीवर आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.