Election Results 2022: गुजरातमध्ये भाजपची सत्ता कायम, हिमाचलमध्ये काँग्रेस पुढे

137

गुजरात विधानसभा निवडणुकीत यावेळीही भाजपने चमकदार कामगिरी केली आहे. भाजप पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करणार असल्याचे दिसत आहे. दुपारी 1 वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार भाजप 154 जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेसबद्दल बोलायचे झाले तर यावेळी काॅंग्रेसची कामगिरी फारशी चांगली नाही. काॅंग्रेस 20 जागांवर आघाडीवर आहे. तर दुसरीकडे आम आदमी पक्षाला या निवडणुकीत फायदा झाला आहे. आप पाच जागांवर आघाडीवर आहे. समोर आलेल्या या आकडेवारीवर आनंदी होऊन मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी.आर. पाटील यांनी जल्लोष  केला.

हिमाचलमध्ये आपची वाईट स्थिती

हिमाचल विधानसभा निवडणुकीबाबत बोलायचे झाले तर इथे काँग्रेस आघाडीवर आहे. दुपारी आलेल्या आकडेवारी नुसार भारतीय जनता पक्ष 26 मतांनी आघाडीवर आहे. काँग्रेस 39 जागांसह आघाडीवर आहे. तसेच, आम आदमी पक्षाचे खातेही उघडलेले नाही. हिमाचल प्रदेशातील नूरपूर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार रणवीर सिंह निक्का विजयी झाले आहेत.

डिंपल यादव मैनपुरीमध्ये दणदणीत विजयाच्या मार्गावर

गुजरात आणि हिमाचल प्रदेशमधील विधानसभा निवडणुकांसोबतच पाच राज्यांतील सहा विधानसभा निवडणुका आणि उत्तर प्रदेशमधील मैनपुरी लोकसभा पोटनिवडणुकीचे निकाल गुरुवारी येणार आहेत. मात्र, अनेक ठिकाणी परिस्थिती स्पष्ट होताना दिसत आहे. बिहारमध्ये जनता दल (संयुक्त), छत्तीसगडमध्ये काँग्रेस, ओडिशात बिजू जनता दल, राजस्थानमध्ये काँग्रेस पोटनिवडणुकीत आघाडीवर आहेत. उत्तर प्रदेशातील मैनपुरीमध्ये समाजवादी पक्षाची कामगिरी आतापर्यंत चांगली राहिली आहे. सपा उमेदवार डिंपल यादव भाजपच्या रघुराज शाक्य यांच्याविरुद्ध आघाडीवर आहेत. दुपारी 1 वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार डिंपल यादव 3,05,326 मतांनी आघाडीवर आहेत, तर भाजपचे उमेदवार रघुराज सिंह शाक्य 1,71,391 मतांनी आघाडीवर आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.